Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरची कंपनी असून रतन टाटा यांना दुसऱ्या कंपनीत जॉब, वडील त्यांच्यावर होते नाराज कारण

रतन टाटा यांना देशात - परदेशात आदराने पाहीले जाते. परंतू त्यांनी आपल्या करीयरची सुरुवात कुठून केली हे फारच कमी लोकांना माहीती असेल...

घरची कंपनी असून रतन टाटा यांना दुसऱ्या कंपनीत जॉब, वडील त्यांच्यावर होते नाराज कारण
ratan tata Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 30, 2023 | 8:08 PM

नवी दिल्ली | 30 ऑगस्ट 2023 : टाटा उद्योग समुहाचे प्रमुख रतन टाटा यांच्या प्रती सर्वांना आदर आहे. त्यांच्या स्वभावामुळे त्यांचे चाहते करोडोत आहेत. इतक्या मोठ्या उद्योग समुहाचे मालक असूनही त्या ‘डाऊन टू अर्थ’ स्वभावामुळे त्यांना नेहमीच सर्वांचे आदर आणि प्रेम मिळाले आहे. टाटा आडनाव असूनही त्यांना कधी त्याचा गर्व झाला नाही. त्यांचे प्राणीप्रेम आणि सामाजिक दातृत्व पाहून त्यांना अनेक जण आपला आदर्श आणि आयकॉन मानतात. परंतू फारच कमी लोकांना त्यांच्या करीयरची सुरुवात कशी झाली हे माहीती असेल. हा किस्सा खूपच रंजक आहे.

ज्यावेळी रतन टाटा ऐन तारुण्यात होते तेव्हा ते अमेरिकेतून अभ्यास करुन भारतात आले, त्यांना खरेतर अमेरिकेतच सेटल व्हायचे होते. परंतू त्याची आजी लेडी नवजबाई या आजारी पडल्याने त्यांना भारतात यावे लागले. ते परतल्यानंतर जेआरडी टाटा यांनी त्यांना नोकरी संदर्भात काही विचारले नाही. त्यांच्याजवळ टाटांचे नाव होते, डीग्री होती, परंतू त्यांनी टाटा समुहात नोकरीसाठी काही प्रयत्न केला नाही. त्यांना पहिल्या नोकरीसाठी आयबीएममधून ऑफर आली. परंतू जेआरडी टाटांना ही गोष्ट कळाली तेव्हा त्यांना खूप राग आला.

जेआरडी रतन टाटांवर भडकले

जेआरडी यांना जेव्हा कळले की रतन टाटा आयबीएममध्ये नोकरीसाठी जात आहेत. तेव्हा ते नाराज झाले. त्यांना ही गोष्ट जराही रुचली नाही. रतन टाटा यांनी एका मुलाखतीत ही गोष्ट सांगितली. रतन टाटा ज्यावेळी आयबीएमच्या ऑफिसमध्ये होते. तेव्हा त्यांना जेआरडी यांचा फोन आला. ते खूपच रागावलेले होते. फोनवर रागाने ते म्हणाले की तू भारतात राहून आयबीएमची नोकरी करू शकत नाहीस. त्यांनी त्याचा बायोडेटा पाठवायला सांगितला.

लेबरपासून मॅनेजरपासून सर्व काम शिकले

रतन टाटांकडे त्यांचा बायोडाटा नव्हता. त्यांनी आयबीएमच्या कार्यालयातच बसूनच त्यांचा बायोडाटा टाईप केला. जेआरडी टाटांनी त्यांचा सीव्ही पाहिला आणि साल 1962 मध्ये टाटा ग्रुपमध्ये नोकरी दिली. सहा महिन्यानंतर रतन टाटांना जमशेदपूर प्लांटच्या टाटा इंजिनिअरिंग एंड लोकोमोटीव्ह कंपनीत ( आता टाटा मोटर्स ) प्रशिक्षण दिले. लेबरपासून मॅनेजरपासून सर्व काम ते शिकले. त्यानंतर टाटा स्टीलमध्ये प्रशिक्षणास ते गेले. त्यानंतर जेआरडी टाटांनी त्यांना ऑस्ट्रेलियात टाटा ग्रुपचे रेसिडेंट रिप्रेजेटिव्ह म्हणून जबाबदारी सोपविली. साल 1970 मध्ये टाटा पुन्हा भारतात आले आणि त्यांनी टीसीएस जॉईन केले. साल 1974 मध्ये रतन टाटा टाटा सन्सचे डायरेक्टर बनले.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.