Ratan Tata : रतन टाटा यांच्या कुंडलीत पारस योग; हात लावताच मातीचे सोने; पण या योगाने सुखी संसाराचे स्वप्न हिरावले

Ratan Tata Horoscope : रतन टाटा एक यशस्वी व्यावसायिकच नाही तर उद्योजक पण होते. ज्योतिषशास्त्राच्या दाव्यानुसार, त्यांच्या कुंडलीतच हा योग होता. त्यांच्या लग्न कुंडलीत बुधादित्य योगामुळेच त्यांना प्रत्येक कामात मोठे यश मिळाले. त्यांना शनिचे बळ मिळाल्याने ऑटो क्षेत्रात त्यांना उंच भरारी घेता आल्याचा दावा आहे.

Ratan Tata : रतन टाटा यांच्या कुंडलीत पारस योग; हात लावताच मातीचे सोने; पण या योगाने सुखी संसाराचे स्वप्न हिरावले
रतन टाटा यांची जन्मकुंडली
Follow us
| Updated on: Oct 10, 2024 | 9:53 AM

देशाचे महान उद्योगपती रतन टाटा आता आपल्यात नाहीत. बुधवारी संध्याकाळी त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुगालयात अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांना प्रेमाच मोठं यश मिळाले नसले तरी व्यावसायिक आणि व्यावहारिक जगतात त्यांनी मोठी भरारी घेतली. ज्योतिषशास्त्राच्या दाव्यानुसार, त्यांच्या जन्मकुंडलीतच याविषयीचे योग होते. अनेक ज्योतिषांनी त्यांच्या जन्मकुंडलीचा अभ्यास केला आहे. विपरीत परिस्थितीत सुद्धा त्यांनी आव्हानं पेलली आणि यशश्री खेचून आणला. त्यांच्या मेहनतीला भाग्याची साथ मिळाल्याचा दावा ज्योतिष करतात. त्यांनी मातीला जरी हात लावला तरी त्याचं सोनं करण्याची ताकद त्यांच्यात होती. सृष्टीतील सर्व ग्रह आणि नक्षत्र त्यांच्या या कार्यात त्यांना बळ देत असल्याचे जन्मकुंडली अभ्यासकांचा दावा आहे.

कशी होती जन्मकुंडली

त्यांच्या जन्मकुंडलीवर नजर टाकल्यास त्यांना कोणत्या ग्रहाचे बळ मिळाले, कोणता योगाने मदत केली हे समोर आले. रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी सकाळी 6.30 वाजता झाला होता. त्यांची जन्मकुंडली धनु लग्न आणि तुळा राशीची आहे. त्यांच्या लग्नात सूर्य, बुध आणि शुक्र जोमात होता. त्यांचा गुरू हा लक्ष्मी योगात, धन गृहात आहे. मंगळ तिसऱ्या घरात आहे. तर शनिची स्थिती चौथ्या घरात आहे. अकराव्या राशीतील चंद्र आणि बाराव्या-सहाव्या भावात राहू-केतूचे घट्ट समीकरण दिसून येते. या स्थितीत रतन टाटा यांच्या कुंडलीत दुर्मिळ असा बुधादित्य योग तयार झाल्याचे दिसून येते. या योगामुळे जातकाला, व्यक्तीला दूरदृष्टी आणि चांगल्या परिणामासाठी योग्य निर्णय घेण्याचे बळ मिळते. म्हणजेच कोणते कार्य केल्यास त्यापासून फायदा होईल की तोटा याचा अंदाज घेण्याची उपजत हतोटी त्या व्यक्तीला, जातकाला प्राप्त होते.

हे सुद्धा वाचा

लग्न कुंडलीत बुधादित्य योग

ज्योतिष शास्त्रानुसार, लग्न कुंडलीत अशा दुर्मिळ योगाला पारस पत्थर योग म्हणतात. त्याचा अर्थ जर अशा व्यक्तीने मातीला जरी हात लावला तरी त्याचं सोनं होईल. म्हणजे हिकमतीने ती व्यक्ती ज्या उद्योगात हात घालेल तो यशस्वी करण्याची हतोटी त्याच्याकडे असेल. त्याचा यशाचा आलेख ग्रहांच्या बळामुळे उंचावेल. कुंडलीतील सूर्य त्यांना निर्णय घेण्याचा आत्मविश्वास आणि दांडगी इच्छा शक्ती देईल. त्यांच्या लग्न कुंडलीतील सध्याचे तीन ग्रहांपैकी एक शुक्र याचा त्यांच्या जीवनावर विशेष प्रभाव असल्याचे दिसून आले. या कुंडलीत शुक्र हा 4 अंशांवर आहे. ही स्थिती त्यांची महत्वाकांक्षा अधोरेखित करते. त्यांची कौटुंबिक स्थिती समोर आणते. त्यामुळेच त्यांच्या जीवनात प्रेमाचा अंकुर तर फुलला पण लग्नापर्यंत मामला काही पोहचलाच नाही. या शुक्रानेच त्यांची शैक्षणिक गुणवत्ता पण सिद्ध केली आहे.

दशमेश बुध आणि भाग्येश संयोग

रतन टाटा यांच्या जन्मकुंडलीत बुधाच्या उपस्थितीने त्यांना यशस्वी उद्योजक होण्याचे बळ दिले आहे. दशमेश बुध आणि भाग्येश संयोगाने त्यांना राज योग प्राप्त झाला. या योगामुळेच त्यांनी व्यक्तिगत जीवनातच उंची गाठली नाही तर सामाजिक आणि व्यावसायिक जगतात प्रतिष्ठा, मान, सन्मान मिळवला. ते उच्च व्यक्तिमत्वाचे धनी ठरले. त्यांची सचोटी, प्रामाणिकपणा, मृदुता हे उपजत गुण या योगाने साधले. रतन टाटा यांच्या कुंडलीत दशमेश बुध, भाग्येश सूर्य आणि लाभेश शुक्र यांचा योग जुळून आला. त्याचे शुभ फळ त्यांना लाभले. त्यांना जागतिक स्तरावर किर्ती मिळवून देण्यात या शुभ योगाचा मोठा लाभ झाला. हा दुर्मिळ योग अत्यंत कमी लोकांच्या कुंडलीत असतो.

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.