Ratan Tata Networth : रतन टाटा यांची एकून संपत्ती किती?, तब्बल इतके कोटी आणि..

रतन टाटा यांच्यावर सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रतन टाटा यांच्या प्रकृतीबाबत विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. रतन टाटा यांनी स्वत: त्यांच्या प्रकृतीविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली.

Ratan Tata Networth : रतन टाटा यांची एकून संपत्ती किती?, तब्बल इतके कोटी आणि..
Ratan Tata
Follow us
| Updated on: Oct 10, 2024 | 12:42 PM

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. रक्तदाबाचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केलंय. सध्या रतन टाटा यांच्यावर उपचार सुरू आहेत. रतन टाटा यांच्या प्रकृतीबाबत विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. रतन टाटा यांनी स्वत: त्यांच्या प्रकृतीविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली. त्या पोस्टमध्ये रतन टाटा यांनी स्पष्टपणे म्हटले की, माझ्या प्रकृतीविषयी अफवा पसरली जात आहे. माझी प्रकृती पाहता माझ्या काही वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. त्यामुळे काळजी करण्यासारखे काहीच कारण नसल्याचे पोस्टमध्ये सांगण्यात आले.

हेच नाही तर त्या पोस्टमध्ये रतन टाटा यांनी स्पष्टपणे म्हटले की, काळजी करण्याचे काहीच कारण नाही आणि चुकीची माहिती पसवरू नये. रतन टाटा यांचे अनेक व्यवसाय आहेत. अत्यंत मोठ्या संपत्तीचे ते मालक आहेत. अनेकांना प्रश्न पडतो की, अखेर रतन टाटा यांची संपत्ती नेमकी किती आहे.

रतन टाटा यांचे नाव श्रीमंत व्यक्तींच्या यादीत खाली येऊ शकते. मात्र, व्यावसायिक साम्राज्यासाठी आणि त्यांच्या मजबूत कार्य नीतिसाठी ओळखले जातात. IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 मध्ये ते 421 व्या क्रमांकावर होते. 2022 मध्ये त्यांची निव्वळ संपत्ती 3,800 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

ज्यामुळे आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये ते 421 व्या क्रमांकावर होते, मागील वर्षी ते 3,500 कोटी रुपयांसह 433 व्या क्रमांकावर होते. रतन टाटा यांची संपत्ती कमी असण्याचे कारण म्हणजे टाटा सन्स या होल्डिंग कंपनीच्या अंतर्गत टाटा ट्रस्ट्स, संस्थांनी केलेल्या एकूण कमाईपैकी 66 टक्के धर्मादाय कार्यांसाठी योगदान देते.

यामुळेच 3,800 कोटी रुपये त्यांची संपत्ती आहे. रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत झाला. रतन टाटा यांच्या वडिलांचे नाव नवल टाटा आणि आईचे नाव सुनी टाटा आहे. रतन टाटा यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले. शिमल्याच्या बिशप कॉटन स्कूलमध्ये पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी विदेशात शिक्षण घेतले. 

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.