सरकारी शाळेत शिक्षण, शेतात राबले, कोण आहे ती व्यक्ती ज्यांना रतन टाटांनी दिले 135 कोटींचे पॅकेज
Ratan Tata: 49,000 कोटी रुपयांचा नफा मिळाल्यानंतर शेअरधारकांचा वाटा 34,625 आला आहे. मागील आर्थिक वर्षांत शेअरधारकांना 16,847.79 कोटी रुपये देण्यात आले होते. रिपोर्टनुसार कंपनीचा महसूल 14.64 टक्के वाढला आहे. तो 4.76 लाख कोटी झाला आहे.

सरकारी शाळेत शिक्षण घेतले. शेतीत कामे केली. आज टाटा ग्रुपची महत्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. रतन टाटा यांचे राईट हॅन्ड समजले जाणारे एन.चंद्रशेखर सध्या चर्चेत आले आहेत. सन 2024 या आर्थिक वर्षात त्यांचे पॅकेज 20 टक्के वाढवण्यात आले आहे. त्यांचे वार्षिक पॅकेज आता 135.32 कोटी रुपये झाले आहे. या पॅकेजमध्ये 121.5 कोटी रुपये कमीशनचा समावेश आहे.
रतन टाटा यांचा संपूर्ण विश्वास
देशातील सर्वात मोठा बिजनेस ग्रुप टाटा सन्सची चेअरमनपदाची जबाबदारी 61 वर्षीय एन चंद्रशेखरन सांभाळत आहेत. त्यांचे सुरुवातीचे जीवन संघर्षमय होते. परंतु मेहनत, चिकाटीच्या जोरावर ते या सर्वोच्च पदापर्यंत पोहचले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा ग्रुपची वाढ जोरात सुरु आहे. रतन टाटा यांचा संपूर्ण विश्वास त्यांच्यावर आहे. यामुळे 2024 मध्ये त्यांच्या पगारात 20 टक्के वाढ करण्यात आली. चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वात टाटा ग्रुपची होल्डिंग कंपनी टाटा सन्सने सन 2023-24 या आर्थिक वर्षात 74 टक्के नफा मिळवला आहे. 6 सप्टेंबर रोजी फार्मकडून दिलेल्या रिपोर्टनुसार हा नफा 49,000 कोटी रुपये आहे.

tata group n chandrasekaran
इंटर्न ते कंपनीच्या संचालक मंडळापर्यंत
एन चंद्रशेखरन यांचा जन्म 1963 तामिळनाडूमधील मोहनूर या गावी झाला. त्यांचे आई-वडील शिक्षक होते. शून्यातून त्यांचा प्रवास सुरु झाला होता. त्यांनी प्राथमिक शिक्षण गावातील सरकारी शाळेत घेतले. त्यानंतर कोयम्बतूर इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून पदवी घेतली. तिरुचिरापल्लीमधील रीजनल इंजीनियरिंग कॉलेजमधून एमसीए केला. 1987 मध्ये टीसीएसमध्ये इंटर्न म्हणून त्यांनी काम सुरु केले. 2007 मध्ये त्यांना कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (COO) बनवण्यात आले. दोनच वर्षांत टीसीएसचे सीईओ झाले. 2016 मध्ये कंपनीच्या संचालक मंडळात आले.




गुंतवणूकदारांना दुप्पट डिव्हिडंट
49,000 कोटी रुपयांचा नफा मिळाल्यानंतर शेअरधारकांचा वाटा 34,625 आला आहे. मागील आर्थिक वर्षांत शेअरधारकांना 16,847.79 कोटी रुपये देण्यात आले होते. रिपोर्टनुसार कंपनीचा महसूल 14.64 टक्के वाढला आहे. तो 4.76 लाख कोटी झाला आहे. कंपनीने आतापर्यंतचा सर्वाधिक लाभांश दिला आहे. एअर इंडिया, विस्तारा, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एआयएक्स कनेक्ट यासारख्या विमान कंपन्यांनी समूहाच्या वाढीसाठी चंद्रशेखरन यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या क्षेत्रातील एकूण तोटा गेल्या आर्थिक वर्षातील 15,414 कोटींच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024 मध्ये 6,337 कोटी रुपयांवर आला आहे.