Ratan Tata : कोण असेल रतन टाटा यांचा उत्तराधिकारी? काही वेळातच होऊ शकते घोषणा

Ratan Tata Successor : टाटा ट्र्स्टचे चेअरमन रतन टाटा यांचे बुधवारी निधन झाले. काल त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. टाटा ट्रस्टची टाटा सन्समध्ये 66% वाटा आहे. रतन टाटा हे टाटा ट्रस्टचे चेअरमन होते, सोबतच टाटा सन्सची जबाबदारी पण त्यांच्या खांद्यावर होती. आता त्यांच्यानंतर या पदावर पुढील वारसदार नेमावा लागणार आहे.

Ratan Tata : कोण असेल रतन टाटा यांचा उत्तराधिकारी? काही वेळातच होऊ शकते घोषणा
रतन टाटा यांचा वारस कोण?
Follow us
| Updated on: Oct 11, 2024 | 12:05 PM

दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टमध्ये त्यांची जागा कोण घेईल, याचा निर्णय अगदी थोड्या वेळात जाहीर होईल. टाटा ट्रस्टने याविषयीची एक बैठक बोलावली आहे. त्यामध्ये रतन टाटा यांचा उत्तराधिकारी निवडल्या जाऊ शकतो. रतन टाटा यांचे बंधू नोएल टाटा यांची निवड होण्याची सर्वाधिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. नोएल हे पूर्वीच सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि टाटा ट्रस्टमध्ये विश्वस्त आहेत. या ट्रस्टची टाटा समूहाच्या टाटा सन्समध्ये 66% हिस्सेदारी आहे. टाटा ट्रस्टने अजून या विषयी कोणतीही टिप्पणी केलेली नाही.

पारसी समाजाची इच्छा काय?

पारसी समाजाने टाटा अडनाव असलेली व्यक्ती टाटा समूहाची उत्तराधिकारी असावी यावर शिक्कामोर्तब केले होते. ते नोएल टाटा यांच्या नावावर सहमत होते. सध्या टाटा ट्रस्टमध्ये दोन जण मुख्य आहेत. यामध्ये टीव्हीएस के वेणु श्रीनिवासन आणि माजी संरक्षण सचिव विजय सिंह यांचा समावेश आहे. हे दोघेही 2018 पासून उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. नोएल यांची कार्यशैली ही रतन टाटा यांच्यापेक्षा अगदी वेगळी मानण्यात येते. प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणे त्यांना आवडते.

हे सुद्धा वाचा

रतन टाटा काय म्हणाले होते

रतन टाटा हे टाटा ट्रस्टचे चेअरमन आणि टाटा सन्सची कमान एकाचवेळी सांभाळत होते. ही दोन्ही पदं सांभाळणारे टाटा कुटुंबातील ते अखेरची व्यक्ती होते. 2022 मध्ये टाटा सन्सच्या संचालक मंडळाने सर्वानुमते त्यांच्या आर्टिकल ऑफ असोसिएशनमध्ये सुधारणा केली होती. त्यानुसार एकच व्यक्ती या दोन्ही पदावर राहु शकणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. सॉयरस मिस्त्री यांच्यासोबत कायदेशीर लढाई झाली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयात रतन टाटा यांची बाजू मांडण्यात आली. त्यांचे वाक्य फार महत्त्वाचे मानण्यात येतात. अनेक जण त्याचे उदाहरण देतात. ‘मी या ट्रस्टचा सध्या अध्यक्ष आहे. भविष्यात दुसरी कोणीतरी व्यक्ती असेल. त्याचे नाव टाटा हेच असावे हे गरजेचे नाही. एका व्यक्तिचे आयुष्य हे मर्यादित असते. तर संघटना नेहमी कार्यरत असते.’ असे म्हणणे रतन टाटा यांनी सुप्रीम कोर्टात मांडले होते.

'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स.
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड.
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट.
नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी; हवाई दलाच्या विमानांची भरारी
नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी; हवाई दलाच्या विमानांची भरारी.
'...पण माझं वय कसं कॉपी करणार?', रोहित पवारांचा कोणाला टोला?
'...पण माझं वय कसं कॉपी करणार?', रोहित पवारांचा कोणाला टोला?.
पंकजा मुंडे अन् जरांगे काय बोलणार? बीडमध्ये एकाच दिवशी दोन दसरा मेळावे
पंकजा मुंडे अन् जरांगे काय बोलणार? बीडमध्ये एकाच दिवशी दोन दसरा मेळावे.
निवडणुकीआधीच सरकारचा मास्टरस्ट्रोक, कॅबिनेटमध्ये ८० निर्णयांचा धडाका
निवडणुकीआधीच सरकारचा मास्टरस्ट्रोक, कॅबिनेटमध्ये ८० निर्णयांचा धडाका.
अनमोल 'रत्न' हरपला... सामान्य लोकं हळहळतील असा शेवटचा उद्योगपती गेला
अनमोल 'रत्न' हरपला... सामान्य लोकं हळहळतील असा शेवटचा उद्योगपती गेला.
उद्योग साम्राज्याचा सूर्य मावळला.. रतन टाटा यांना साश्रूनयनांनी अलविदा
उद्योग साम्राज्याचा सूर्य मावळला.. रतन टाटा यांना साश्रूनयनांनी अलविदा.
रतन टाटांना मुकेश अंबानींकडून श्रद्धांजली, NCPA त घेतलं अखेरचं दर्शन
रतन टाटांना मुकेश अंबानींकडून श्रद्धांजली, NCPA त घेतलं अखेरचं दर्शन.