AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या भाग्यवंताला 500 कोटींचे घबाड! रतन टाटा यांच्या मृत्युपत्रात मोठा खुलासा

Ratan Tata Will : रतन टाटा यांच्या मृत्यूपत्राने अनेकांची झोप उडवली आहे. अनेकांना धक्का बसला आहे. कारण यामध्ये 500 कोटींची संपत्ती एका अनोळखी व्यक्तीला देण्याचे सांगण्यात आले आहे. कोण आहे ती अनोळखी व्यक्ती? Mystery Man चे नाव तरी काय?

या भाग्यवंताला 500 कोटींचे घबाड! रतन टाटा यांच्या मृत्युपत्रात मोठा खुलासा
रतन टाटा
| Updated on: Feb 07, 2025 | 9:26 AM
Share

रतन टाटा यांच्या मृत्यूपत्राने उद्योगजगताला एका मागून एक धक्के बसले आहेत. या मृत्यूपत्रात एका अनोळखी व्यक्तीला 500 कोटींची संपत्ती देण्यास सांगण्यात ले आहे. त्यामुळे सर्वसामान्यच नाही तर टाटा कुटुंबियातील लोकांना सुद्धा मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत टाटा यांच्यासोबत सार्वजनिक रूपात ही व्यक्ती तितकीशी चर्चेत नव्हती. पण या व्यक्तीचे जवळपास 60 वर्षांपासून रतन टाटा यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध होते. तिचे नाव वाचून अनेकांना झटका बसला. याविषयीची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. कोण आहे ती अनोळखी व्यक्ती? Mystery Man चे नाव तरी काय?

कोण आहे ती व्यक्ती?

रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रात एका व्यक्तीला 500 कोटी रुपये संपत्ती देण्यास सांगण्यात आल्याचे समोर येत आहे. ही व्यक्ती जमशेदपूर येथील आहेत. ट्रॅव्हल क्षेत्रातील उद्योजिका मोहिनी मोहन दत्ता यांना ही लॉटरी लागली आहे. हा टाटा कुटुंबियांना सुद्धा धक्का मानण्यात येत आहे. माध्यमातील वृत्तानुसार, दत्ता आणि त्यांच्या कुटुंबाकडे ट्रॅव्हल एजन्सी स्टॅलियनमध्ये मालकी होती. 2013 मध्ये ही एजन्सी ताज ग्रुप ऑफ होटल्सच्या ताज सर्व्हिसेज मध्ये विलीन करण्यात आले होते.

मोहिनी दत्ता आणि त्यांच्या कुटुंबाकडे स्टॅलियनमध्ये 80% वाटा होता. तर उर्वरीत हिस्सा हा टाटा समूहाकडे होत. मोहिनी यांनी थॉमस कुकची सहकारी कंपनी टीसी ट्रॅव्हल सर्व्हिसेजचे संचालक म्हणून सुद्धा काम पाहिले आहे.

अधिकाऱ्यांनी नाही दिली प्रतिक्रिया

रतन टाटा यांना अगदी जवळून पाहणाऱ्या लोकांनी सांगितले की, दत्ता या दीर्घकाळापासून रतन टाटा यांच्या सहकारी होत्या, त्यांच्या कुटुंबाशी त्यांचे चांगले संबंध होते. ईटीच्या वृत्तानुसार, त्यांनी मोहिनी दत्ता यांच्याशी यासंबंधी संपर्क साधला असता, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर मृत्युपत्राचे वाचन करणारे कार्यकारी अधिकारी आणि रतन टाटा यांची चुलत बहिणी शिरीन आणि डीना जेजीभाय यांनी सुद्धा प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर डेरियस खंबाट यांनी सुद्धा कोणतीची टिप्पणी केली नाही. अधिकारी मेहली मिस्त्री यांनी याप्रकरणी कोणीही प्रतिक्रिया देण्यास तयार नसल्याचे ईटीला सांगितले. दत्ता यांना दोन मुली आहेत. त्यापैकी एकीने 2024 पर्यंत, 9 वर्षांपर्यंत टाटा ट्रस्टमध्ये काम केले होते. तिने त्यापूर्वी ताज हॉटेल समूहात काम केले होते.

संपत्ती वाटपासाठी दोन ट्रस्ट

रतन टाटा यांनी आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्ट स्थापन केले होते. या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी संपत्तीचे वाटप करण्याचे ठरवले होते. त्यांच्या संपत्तीमधील जास्तीत जास्त संपत्ती ही धार्मिक कार्यासाठी देण्याचे ठरवले होते. त्यासाठी त्यांनी चुलत बहिण आणि इतरांची नेमणूक केली हे. त्यांची टाटा सन्समध्ये 0.83 टक्क्यांचा वाटा होता. त्यांची एकूण संपत्ती जवळपास 8,000 कोटी रुपये होती.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.