रतन टाटा यांच्या संपत्तीचा सर्वात मोठा भाग कोणाला? 3800 कोटींच्या संपत्तीचा कोणाला किती भाग? बंदूक दिली कोणाला?
Ratan Tata Will: मेहली मिस्त्री यांना अलिबाग बंगला भेट देताना रतन टाटा यांच्या दृष्टीकोन दिसून येतो. त्यांनी म्हटले की, आलिबागची मालमत्ता बांधण्यात मिस्त्री यांचे मोठे योगदान आहे. यामुळे हे ठिकाण त्यांना एकत्र घालवलेल्या आनंदाच्या क्षणांची आठवण करून देईल.

Ratan Tata Will: टाटा ग्रुपचे माजी चेअरमन रतन टाटा यांच्या निधनास आता सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला आहे. त्यांच्या मृत्युपत्रात संपत्तीच्या वाटणीबाबत सर्व माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या संपत्तीचा सर्वात मोठा भाग दान-पुण्यकर्मासाठी खर्च केला आहे. इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार त्यांच्याकडे जवळपास 3,800 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यातील मोठा भाग ‘रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन’ आणि ‘रतन टाटा एंडोमेंट ट्रस्ट’ ला दिली आहे. या संस्था सामाजिक कार्यात काम करतात. रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात नातेवाईक, मित्र, कर्मचारी इतकेच नव्हे तर प्राण्यांचाही विचार केला आहे.
मित्राला दिली ही संपत्ती
रतन टाटा यांचे 9 ऑक्टोंबर रोजी निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी केलेले मृत्यूपत्र समोर आले. त्याच्या इतर मालमत्तेपैकी एक तृतीयांश म्हणजे सुमारे 800 कोटी रुपये ज्यात बँक एफडी, आर्थिक साधने, घड्याळे आणि पेंटिंग यांचा समावेश आहे. त्यांच्या सावत्र बहिणी शिरीन जेजीभॉय आणि दिना जेजीभॉय यांच्याकडे ही मालमत्ता जाणार आहे. जुहू येथील बंगल्याचा काही भाग त्यांचा भाऊ जिमी नवल टाटा यांना देण्यात आला आहे. त्याचवेळी त्यांचा जवळचा मित्र मेहली मिस्त्री याच्याकडे अलिबागची मालमत्ता आणि त्याच्या तीन मौल्यवान बंदुका दिल्या. त्यात पॉइंट 25 बोअरच्या पिस्तुलाचा समावेश आहे.
शंतनू नायडूला दिलेले कर्ज माफ
रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांच्या पाळीव प्राण्यांचाही विचार केला आहे. त्या प्राण्यांसाठी त्यांनी12 लाख रुपयांचा तरतूद केली आहे. त्यातून प्रत्येक पाळीव प्राण्याला प्रत्येक तिमाहीत ₹30,000 मिळतील. तसेच त्यांचा मित्र आणि कार्यकारी सहाय्यक शंतनू नायडू यांना दिलेले शैक्षणिक कर्ज माफ करण्यात आले आहे. सेशेल्सची जमीन आरएनटी असोसिएट्स सिंगापूरला दिली जाईल. जिमी टाटा यांना चांदीची भांडी आणि काही दागिने मिळतील.




कधी होणार मालमत्तेचे वाटप
मेहली मिस्त्री यांना अलिबाग बंगला भेट देताना रतन टाटा यांच्या दृष्टीकोन दिसून येतो. त्यांनी म्हटले की, आलिबागची मालमत्ता बांधण्यात मिस्त्री यांचे मोठे योगदान आहे. यामुळे हे ठिकाण त्यांना एकत्र घालवलेल्या आनंदाच्या क्षणांची आठवण करून देईल. न्यायालयाकडून त्यांच्या मृत्यूपत्राची पुष्टी झाल्यानंतरच मालमत्तेची वाटणी केली जाईल. त्याला 6 महिन्यांचा कालवधी लागू शकतो.