AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ratan Tata : रतन टाटा यांच्या सावत्र आई पण हाडाच्या उद्योजिका! सौंदर्य प्रसाधानात अनेक जागतिक ब्रँडला पाजले पाणी!

Ratan Tata : टाटा यांच्या घरात सर्वचजण उद्यमशील आहेत. त्यांचे देशाच्या उद्योग क्षेत्रात मोठे योगदान आहेत. रतन टाटा यांनी मोठा पल्ला गाठला आहे. पण त्यांच्या सावत्र आई पण हाडाच्या उद्योजिका असल्याने त्यांनी सौंदर्य प्रसाधनांचा हा जागतिक ब्रँड उभारला.

Ratan Tata : रतन टाटा यांच्या सावत्र आई पण हाडाच्या उद्योजिका! सौंदर्य प्रसाधानात अनेक जागतिक ब्रँडला पाजले पाणी!
| Updated on: Aug 22, 2023 | 3:03 PM
Share

नवी दिल्ली | 22 ऑगस्ट 2023 : बिझनेस टायकून रतन टाटा (Ratan Tata) यांना आशियातच नाही तर जगभरात मान आहे. त्यांचा साधेपणा आणि विनम्रता जगभर प्रसिद्ध आहे. टाटा घराण्यात अनेक उद्यमशील व्यक्ती झाल्या. समाजसेवा हा पण टाटा कुटुंबियांचा एक वाखणण्याजोगा गुण आहे. जगभरात रतन टाटा यांचे नाव गाजत आहेत. त्यांच्यासोबत अजून एका महिला उद्योजिकेचा पण मोठा सन्मान करण्यात येतो, रतन टाटा यांच्या सावत्र आई सिमोन नवल टाटा (Simone Naval Tata) या पतीसारख्याच उद्यमशील होत्या. त्यांनी भारतात आल्यावर सौंदर्य प्रसाधानात जागतिक ब्रँड तयार केला. फ्रान्स ही फॅशनची पंढरी आहे. तिथे अनेक जागतिक ब्रँड आहेत. त्याच तोडीचा हा भारतीय ब्रँड तयार करुन सिमोन टाटा यांनी इतिहास घडवला.

Lakme चे नाव ऐकलं ना

लॅक्मे सौंदर्य प्रसाधनामधील जागतिक ब्रँड आहे. नोवेल टाटा यांची आई आणि रतन टाटा यांची सावत्र आई, सिमोन टाटा यांनी हा ब्रँड बाजारात उतरविण्यासाठी मोठे कष्ट उपसले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर हा ब्रँड बाजारात आला होता. या ब्रँडने बाजारात येताच धुमाकूळ घातला होता.

कॉस्मेटिक कंपनीच्या चेअरमन

रतन टाटा यांच्या काळात टाटाने अनेक क्षेत्रात उद्योग उभारणी केली. त्यांच्या परंपरागत उद्योगांनी मोठी उभारी घेतली. तर नवीन कंपन्यांनी पण व्यवसायात मोठा जम बसवला. रतन टाटा यांची सावत्र आई सिमोन टाटा यांनी कॉस्मेटिक क्षेत्रात मोठी कामगिरी बजावली. त्या या कॉस्मेटिक कंपनी लक्मेच्या चेअरवुमन होत्या.

भारतातच झाल्या स्थायिक

सिमोन टाटा या मुळच्या स्वित्झर्लंडच्या गिनेव्हाच्या. 23 व्या वर्षी त्या भारतात फिरायला आल्या. 1930 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांची भेट रतन टाटा यांचे वडील नवल एच. टाटा यांच्याशी झाली. 1955 मध्ये दोघे एकत्र आले. सिमोन या मुंबईतच स्थायिक झाल्या. नोवेल टाटा यांच्या त्या आई आहेत. नवल टाटा यांच्याशी लग्नानंतर त्या रतन टाटा यांच्या सावित्री आई झाल्या.

लॅक्मने रचला इतिहास

लॅक्मेने कमी कालावधीत मोठी घौडदौड केली. त्यांनी रिटेल सेक्टरमध्ये मोठी झेप घेतली. हा चांगला ब्रँड 1996 मध्ये हिंदुस्थान लिव्हर लिमिटेडला (HLL) विकण्यात आला. या विक्रीतून बेस्टसाईट ब्रँडची स्थापना करण्यात आली. या ब्रँडने नंतर मोठी झेप घेतली. जागतिक बाजारात पण या ब्रँडने स्वतःची ओळख तयार केली.

लॅक्मेच्या यशाचा मोठा फायदा

सिमोन टाटा त्यानंतर टाटा ऑईल मिल्स, लॅक्मेमध्ये 1962 साली रुजू झाल्या. 20 वर्षांच्या अथक परिश्रमाने त्यांनी मोठा पल्ला गाठला. लॅक्मेच्या यशाचा त्यांना फायदा झाला. त्या 1989 मध्ये कंपनीच्या अध्यक्ष झाल्या. टाटा इंडस्ट्रीजच्या बोर्डवर त्यांना नियुक्ती देण्यात आली. लॅक्मेच्या यशाचा त्यांना मोठा फायदा झाला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.