देशातील ‘या’ तीन बँकांमध्ये तुमचे पैसे आहेत? RBI चं मोठं वक्तव्य

D-SIB म्हणजे Domestic Systemically Important Banks.याचा अर्थ असा की या बँकांवर आपण विश्वास ठेऊ शकतो.

देशातील 'या' तीन बँकांमध्ये तुमचे पैसे आहेत? RBI चं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 6:57 PM

मुंबई : देशात गेल्या काही वर्षांमध्ये बॅंकिंग क्षेत्रात (Banking fraud) आर्थिक गैरव्यवहार झाले. बँकाना काही बड्या खातेधारकांनी गंडा घातला. पण त्याचा फटका हा सामन्य खातेधारकांना बसला. यामुळे बँकेतील व्यवहारांवर मर्यादा घालण्यात आली. यामुळे सर्व सामन्यांची गैरसोय झाली. तसेच दिवसेंदिवस होणाऱ्या बँकेतील गैरव्यवहारांमुळे आपला बॅंकेतील ठेव सुरक्षित आहे ना, असा प्रश्न असंख्य खातेधारकांसमोर निर्माण झाला. मात्र आता थेट आरबीआयने   (Reserve Bank of India) व्यवहारासाठी आणि भविष्यातील गुंतवणुकीसाठी कोणत्या बँका सुरक्षित आहे, याची माहिती दिली आहे. यामुळे खातेधारकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. (rbi big statment about icici sbi and hdfc bank)

भारतीय स्टेट बॅंक (SBI), आयसीआयसीय बँक (ICICI) आणि एचडीएफसी बॅंक (HDFC) या 3 बँकेत तुमच्या ठेवी सुरक्षित आहेत, अशी माहिती आरबीआयने दिली आहे. आरबीआयने D-SIB यादी प्रसिद्ध करत याबाबतची माहिती दिली आहे.

D-SIB म्हणजे काय?

D-SIB म्हणजे Domestic Systemically Important Banks. डीएसआयबी यादीद्वारे जाहीर करण्यात आलेल्या बँका या विश्वासार्ह आहेत. म्हणजेच या वरील 3 बॅंकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला पैशांबाबत चिंता करण्याची गरज नाही. कोरोना काळात बॅंकिंग क्षेत्रात घसरण झाली होती. तसेच येस बॅंक प्रकरणानंतर बँकेत पैसे ठेवायचे की नाहीत, असा यक्ष प्रश्न सामन्यांसमोर उपस्थित झाला होता. मात्र आता आरबीआयने ही यादी प्रसिद्ध केल्याने 3 बँकामधील खातेधारकांना दिलासा मिळाला आहे.

आरबीआयने काय म्हटलं?

आरबीआयने D-SIB 2020 ही यादी प्रसिद्ध केली. याद्वारे सांगितलं की SBI,ICICI आणि HDFC या बँकांनी अनेकांना कर्ज दिलं आहे. यानंतरही कोरोनासारख्या प्रतिकूल परिस्थितीतही या बँकांवर कोणताही परिणाम झाला नाही.

संबंधित बातम्या :

Banking Alert | HDFC ग्राहकांनो लक्ष द्या! महत्त्वाचे व्यवहार लवकर उरका, काही तासांसाठी बंद राहणार ‘या’ सेवा…

Banking fraud | सावधान! आता गुगलवरुनही बँकिंग फ्रॉड

YES बँकेवर आरबीआयचे निर्बंध, ग्राहकांना 50 हजारच काढता येणार

संजय राऊतांच्या पत्नीला PMC बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीचे समन्स का? नेमकं प्रकरण काय?

(rbi big statment about icici sbi and hdfc bank)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.