E-Rupee : बिनधास्त वापरा आधुनिक जगाचं चलन, कुठलीही फसगत होणार नाही, RBI गव्हर्नर यांनी असा दूर केला संभ्रम..

E-Rupee : ई-चलन वापरात कुठलाही धोका नसल्याचा दावा आरबीआयच्या गव्हर्नर यांनी केला आहे.

E-Rupee : बिनधास्त वापरा आधुनिक जगाचं चलन, कुठलीही फसगत होणार नाही, RBI गव्हर्नर यांनी असा दूर केला संभ्रम..
बिनधास्त करा व्यवहारImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 07, 2022 | 9:50 PM

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (RBI Governor) शक्तिकांत दास यांनी बुधवारी भारताच्या पहिल्या डिजिटल चलनाविषयी (Digital Rupee) संभ्रम दूर केला. केंद्रीय बँक डिजिटल रुपया (CBDC) एखाद्या रोखी सारखेच आहे. यामध्ये व्यवहार करताना याची माहिती बँकाकडून जाणार नाही. त्यामुळे जनतेने गोपनीयतेबाबत कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये. नागरीक E-Rupee च्या माध्यमातून बिनधास्त व्यवहार करु शकतात. महागाई आणि रेपो दराबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

दास यांनी दावा केला आहे की, ई-रुपयाचा पायलट प्रकल्प जोरदार राहिला. त्याचे परिणामही समोर आले आहेत. या चाचणीत हे चलन वापरण्याजोगे असून त्यामुळे व्यवहारांना अथवा लोकांच्या गोपनियतेला कसालाही धोका नसल्याचा दावा दास यांनी केला.

आरबीआयने सीबीडीसीच्या माध्यमातून ई-रुपयाच्या पथदर्शी प्रकल्पाची चाचणी केली आहे. ई-रुपयाचे काही बँकांसोबत पहिला पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला. डिसेंबरपासून या पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात झाली. त्याअगोदर नोव्हेंबर महिन्यात याचा प्रयोग करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

आपण एखाद्याला रोखीत व्यवहार करत असाल तर त्याची माहिती व्यवहार करणाऱ्यांना माहिती असते. डिजिटल चलनातील व्यवहाराचेही असेच होईल. हा व्यवहार बँकांना काही कळणार नाही. व्यवहार करणाऱ्यांनाच त्याची माहिती असेल, असे गव्हर्नर म्हणाले.

परंतु, रोखीत व्यवहार करताना तुम्हाला आयकर विभागाच्या मर्यादा पाळाव्या लागणार आहे. या व्यवहारासाठी आयकर विभागाच्या निश्चित मर्यादा पाळव्या लागतील. रोख रक्कमेसाठी आयकर खात्याचे जे नियम आहेत. तेच ई-रुपयाला लागू असतील.

आरबीआयचे पूर्व गव्हर्नर डी. सुब्बाराव यांच्यासह अनेक तज्ज्ञांनी डिजिटल चलन संबंधी गोपनियतेबाबत शंका उपस्थित केली होती. त्यांच्या मते, डिजिटल चलनातील व्यवहार बँकांकडे नोंदवल्या जातील, त्यामुळे वापरकर्त्यांची गोपनियता भंग पावू शकते.

आरबीआयचे डिप्टी गव्हर्नर टी. रवीशंकर यांनी मात्र एका मर्यादेपर्यंत या शंकेला समर्थन दिले आहे. पण आरबीआय, कागदी नोटाच्या व्यवहारासारखाच हा व्यवहार बँकेच्या लक्षात येणार नाही, अशी तजवीज करणार आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.