बँक ग्राहकांना झटका, ATM मधून पैसे काढण्याच्या नियमात बदल, नवे नियम काय?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) तब्बल 9 वर्षांनंतर एटीएम व्यवहारसंदर्भातील नियमावलीत बदल करण्यास परवानगी दिली आहे. (RBI hikes ATM interchange fee per transaction)

बँक ग्राहकांना झटका, ATM मधून पैसे काढण्याच्या नियमात बदल, नवे नियम काय?
ATM
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 12:49 PM

RBI Hikes ATM Interchange Fee मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) तब्बल 9 वर्षांनंतर एटीएम व्यवहारसंदर्भातील नियमावलीत बदल करण्यास परवानगी दिली आहे. आरबीआयने सर्व बँकांना एटीएम व्यवहारांसाठी इंटरचेंज शुल्क वाढविण्यास परवानगी दिली. मात्र पाच वेळा मोफत वापरण्याची सुविधा एटीएम ग्राहकांना सुरु ठेवावी, असे आरबीआयने म्हटलं आहे. पण त्यानंतर प्रत्येक विनाआर्थिक व्यवहारांसाठी 6 रुपये मोजावे लागतील. त्यासोबतच आर्थिक व्यवहारांची फी म्हणजे पैसे काढण्यासाठी आता 15 रुपयांवरून 17 रुपये द्यावे लागणार आहे. (RBI hikes ATM interchange fee per transaction from 15 to 17 Rupees)

बिझिनेस स्टँडर्ड्सच्या अहवालानुसार, भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (RBI) तब्बल 9 वर्षांनंतर एटीएम व्यवहारांसाठी इंटरचेंज फी रचनेत वाढ करण्याची परवानगी दिली आहे. सध्या देशभरात एटीएमची संख्या वाढली आहे. त्याच्या सुरक्षेचा आणि देखभाल खर्च लक्षात घेता बँकांना आता अधिक शुल्क घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे एटीएम ग्राहकांना लवकरच झटका बसणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून खासगी बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर इंटरचेंज फी ही 15 रुपयांवरून 18 रुपये करा, अशी मागणी करत आहेत. यासंदर्भात येत्या जून 2019 मध्ये भारतीय बँकांच्या असोसिएशनच्या मुख्य कार्यकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशींच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.

1 ऑगस्टपासून नवे नियम 

आरबीआयच्या नव्या अहवालानुसार, येत्या 1 ऑगस्ट 2021 पासून आरबीआयने एटीएममधून आर्थिक व्यवहार करण्यासाठी प्रत्येक व्यवहाराची इंटरचेंज फी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता ही फी 15 रुपयांहून 17 रुपये करण्यात आली आहे. तर बिगर-आर्थिक व्यवहारासाठी 5 रुपयांवरून 6 रुपये केली आहे.

विशेष म्हणजे येत्या 1 जानेवारी 2022 पासून बँकांना ग्राहकांकडून 21 रुपये शुल्क घेण्याची परवानगी दिली आहे. सध्या सर्व बँकांना जास्तीत जास्त 20 रुपये शुल्क घेण्याची परवानगी देण्यात आली आहे

एटीएम इंटरचेंज फी म्हणजे नेमकं काय?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल एटीएम इंटरचेंज म्हणजे काय? याचा आपल्यावर किती आणि कसा परिणाम होईल? याची माहिती आम्ही आम्ही तुम्हाला देणार आहोत. समजा तुम्ही SBI बँकेचे ग्राहक असाल आणि तुम्ही एसबीआय कार्ड वापरुन पंजाब नॅशनल बँक (PNB) एटीएममधून पैसे काढलात, तर तुम्हाला एक विशिष्ट फी भरावी लागते. यालाच एटीएम इंटरचेंज फी असे म्हणतात.

ग्राहकांवर काय परिणाम?

याआधी ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी काहीही फी आकारली जात नव्हती. मात्र आता इतर बँकांच्या एटीएममधून पैसे काढणे हे महागडे ठरु शकते. तसेच आरबीआयच्या म्हणण्यानुसार ग्राहक आपल्या स्वत:च्या बॅँकेतून प्रत्येक महिन्याला पाच वेळा विनाशुल्क पैसे काढू शकतात. तर अन्य बॅँकेच्या एटीएममधून 3 आणि मेट्रो शहरातील एटीएममधून 5 वेळा व्यवहार करु शकता. त्या पुढील प्रत्येक व्यवहारांवर शुल्क द्यावे लागणार आहे. (RBI hikes ATM interchange fee per transaction from 15 to 17 Rupees)

संबंधित बातम्या : 

सरकारी कर्मचारी मालामाल, 1 जुलैपासून मोठी पगारवाढ, महिन्याचा पगार किती हजारांनी वाढणार?

तुमचे PPF अकाऊंट बंद झालंय का? पुन्हा सुरु करण्यासाठी जाणून घ्या टिप्स

Investment tips : 5 वर्षात रक्कम डबल, SIP सुरु करण्यासाठी 5 चांगल्या योजना

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.