रेस्टॉरंट आणि ब्यूटी पार्लरही बँकेकडून कर्ज काढू शकणार, RBI ची नवी सुविधा

यामुळे रेस्टॉरंट, बस ऑपरेटर्स, पर्यटन क्षेत्र, ब्यूटी पार्लर आणि विमान सेवांना अतिरिक्त कर्ज मिळणार आहे. (RBI opens separate liquidity window for hotel, tourism, aviation industries)

रेस्टॉरंट आणि ब्यूटी पार्लरही बँकेकडून कर्ज काढू शकणार, RBI ची नवी सुविधा
beauty-parlors
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 3:12 PM

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रभावित झालेल्या क्षेत्रासाठी मोठी घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँकेने संपर्क संवेदन क्षेत्र contact-intensive sectors साठी मोठी घोषणा केली आहे. आरबीआयने या क्षेत्रासाठी 15,000 कोटींची ऑन-टॅप लिक्विडिटीची सुरुवात केली आहे. यामुळे रेस्टॉरंट, बस ऑपरेटर्स, पर्यटन क्षेत्र, ब्यूटी पार्लर आणि विमान सेवांना अतिरिक्त कर्ज मिळणार आहे. (RBI opens separate liquidity window for hotel, tourism, aviation industries)

RBI चे तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक धोरण जाहीर 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2021 या वर्षासाठीचे तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक धोरण जाहीर केले. आरबीआयने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट हे कायम राहिले आहेत. रेपो रेट 4 टक्के, रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के कायम राहील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी तिसऱ्या तिमाहीचे पतधोरण जाहीर करताना ही माहिती दिली.

यावेळी रिझर्व्ह बँकेने contact-intensive sectors साठी मोठी घोषणा केली. यामुळे या क्षेत्रात येणाऱ्यांना कर्जाची सुविधा उपलब्ध होणार आहे. कोरोना काळात आर्थिक स्थिरतेचे वातावरण आणण्यासाठी RBI पूर्णपणे वचनबद्ध आहे. याच पार्श्वभूमीवर सामावून घेण्याचा दृष्टीकोन असलेले धोरण अवलंबणे गरजेचे आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणाले की, रिझर्व्ह बँकेचे लक्ष्य हे liquidity समान वितरण करणे आहे. यासाठी आपल्याला अर्थव्यवस्थेला पुन्हा विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याची गरज आहे. या क्षेत्रात आतापर्यंत 36,545 कोटी रुपयांची तरलता (liquidity) देण्यात आली होती. तर शासकीय सिक्युरिटीज 1.0 (G-Sec) अंतर्गत 40,000 कोटी रुपयांच्या सिक्युरिटीज खरेदी करण्यासाठी एक मोहीमही सुरु करण्यात आली होती.

31 मार्च 2022 पर्यंत मिळणार सुविधा 

या नव्या आर्थिक धोरणाची घोषणा करताना आरबीआय गव्हर्नर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15,000 कोटी रुपयांसाठी येत्या 31 मार्च 2022 पर्यंत एक वेगळी लिक्विडीट विंडो उघडली जाईल. ज्यात रेपो दरावर तीन वर्षांची मुदत असेल.

‘या’ क्षेत्राला मिळेल नवीन कर्ज

या योजनेत बँका, हॉटेल आणि रेस्टॉरंट्स, टुरिझम – ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर्स, अ‍ॅडव्हेंचर अँड हेरिटेज फॅसिलिटीज, एव्हिएशन एंन्सिलरी सर्व्हिसेस – ग्राउंड हँडलिंग अँड सप्लाय चेन, बस ऑपरेटर, कार रिपेयर सर्व्हिसेस यासारख्या इतर सेवांचा सहभागी असेल. तसेच रेंट -अ-कार सर्विस प्रोवायडर्स, इव्हेंट आयोजक, स्पा क्लिनिक, ब्युटी पार्लर आणि सलून यांना नवीन कर्ज मिळू शकते .

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक परिणाम हा लघु उद्योजकांवर बसला आहे. त्यामुळे आरबीआयच्या या निर्णयामुळे या क्षेत्रांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (RBI opens separate liquidity window for hotel, tourism, aviation industries)

संबंधित बातम्या : 

RBI Monetary Policy | रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर, व्याज दर जैसे थे, ईएमआयवरही परिणाम नाही!

ना पार्ट टाईम जॉब, ना बिझनेस, नोकरीसोबत Second Income Source तयार करण्यासाठी भन्नाट टिप्स

निवृत्तीनंतरच आनंदात जगायचंय, मग आजच सुरु करा NPS अकाऊंट, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.