Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RBI Monetary Policy : पुन्हा तुमचा ईएमआयचा हप्ता वाढणार? आज ‘आरबीआय’ रेपो रेट पॉलिसी जाहीर करणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून आज जून महिन्याचा पतधोरण आढावा जाहीर करण्यात येणार आहे. रेपो रेटमध्ये वाढ होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. मात्र ही वाढ किती असेल याबाबत मतभिन्नता दिसून येते.

RBI Monetary Policy : पुन्हा तुमचा ईएमआयचा हप्ता वाढणार? आज 'आरबीआय' रेपो रेट पॉलिसी जाहीर करणार
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 7:04 AM

नवी दिल्ली : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) आज जून महिन्याचा पतधोरण आढावा जाहीर करण्यात येणार आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार आज पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. रेपो रेट वाढल्यास त्याचा परिणाम थेट कर्जावर होणार असून, कर्ज महाग होणार आहे. तसेच ईएमआयमध्ये देखील वाढ होणार आहे. सध्या देशात महागाईचा (Inflation) भडका उडाला आहे. आरबीआय महागाई कमी करण्यासाठी रेपो रेटमध्ये पुन्हा एकदा वाढ करू शकते. यापूर्वी गेल्या महिन्यात आरबीआयकडून रेपो रेटमध्ये 0.4 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. मात्र आज रेपो रेटमध्ये वाढ झाल्यास किती होणार याबाबत तज्ज्ञांमध्ये एकमत दिसून येत नाहीये. नुकतीच पेट्रोल, डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या अबकारी करात कपात करण्यात आली आहे. अबकारी करात कपात करण्यात आल्याने पेट्रोल, डिझेल स्वस्त झाले त्यामुळे महागाईपासून थोडा दिसाला मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर रेपो रेटमध्ये (Repo rate) 0.4 टक्क्यांपेक्षा कमीच वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

रेपो रेट वाढीचे संकेत

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नुकत्याच एका मुलाखतीत म्हटले होते की, रेपो रेटमध्ये निश्चितपणे वाढ होणार आहे. मात्र ती किती असेल हे आत्ताच सांगता येणार नाही. याबाबत बोलताना बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ मदन सबनवीस यांनी म्हटले आहे की, सध्या सुरू असलेली एमपीसीची बैठक महागाई आणि रेपो रेट वाढीसंदर्भात महत्त्वपूर्ण आहे. या बैठकीत रेपो रेटमध्ये वाढीचा निर्णय घेण्यात येईल. मात्र रेपो रेटमधील ही वाढ 25 ते 35 बेसीस पॉईंटपेक्षा अधिक नसेल. तर दुसरीकडे हाउसिंग डॉट कॉम, प्रॉपटाइगर डॉट कॉम आणि मकान डॉट कॉमचे सीईओ ध्रुव अग्रवाल यांनी देखील आज रेपो रेटमध्ये वाढ होऊ शकते असे म्हटले आहे. महागाई कमी करण्यासाठी आज आरबीआय रेपो रेटमध्ये वाढ करेल असे त्यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

वर्षभर रेपो रेटमध्ये वाढ सुरूच राहणार

दरम्यान चालू वर्षात वर्षभर आरबीआयकडून रेपो रेटमधील वाढ सुरूच राहील असे देखील तज्ज्ञांनी म्हटले आहे. महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी आणि बाजारातील चलन कमी करण्यासाठी वर्षभर ठराविक कालावधिनंतर रेपो रेटमध्ये वाढ करण्यात येईल. चालू वर्षाच्या शेवटपर्यंत रेपो रेट कोव्हिड पूर्व काळातील 5.15 टक्क्यांच्या पातळीपर्यंत पोहोचेल असा अंदाज देखील तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका.
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता.
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?.
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.