आर्थिक सुधारणेचा वेग चांगला मात्र कच्च्या तेलाच्या वाढत्या भावामुळे धक्का बसणार: आशिमा गोयल यांचे मत; त्या म्हणतात आर्थिक दर चांगला पण…
भारतीय अर्थव्यवस्थेचा आर्थिक दर चांगला असला तरी कच्च्या तेलाच्या किंमती जर उंचावत राहिल्या तर आर्थिक वाढीमध्ये थोड्याफार फरकाने परिणाम होणार आहे.
मुंबईः आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षात 8.9 टक्के दराने वाढण्याची अपेक्षा आहे. हे आधीच्या ९.२ टक्के अंदाजापेक्षा कमी असले तरी भारताच्या आर्थिक पुनरुज्जीवनाचा (Economic revival) वेग कोविड-19 नंतरही चांगला असून विकास दरही अपेक्षेपेक्षा आता चांगला असल्याचे सांगण्यात येत आहे. हे यापुढेही सुरू राहील, परंतु कच्च्या तेलाच्या (Crude oil price) वाढत्या किंमतीमुळे अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनाला ‘झटका’ बसण्याची शक्यता असण्याचे मत अर्थतज्ज्ञ आशिमा गोयल यांनी रविवारी व्यक्त केले. आशिमा गोयल या रिझव्र्ह बँकेच्या (Reserve Bank of India) चलनविषयक धोरण समितीच्या (आरबीआय एमपीसी) सदस्य आहेत. त्यावेळी त्यांनी सांगितले की, पुरवठा स्थितीत आणखी सुधारणा झाली असली तरी चलनवाढ मध्यवर्ती बँकेच्या समाधानकारकते एवढीच आहे.
“ कोविड-19 नंतरही भारतातील आर्थिक पुनरुज्जीवन चांगल्या गतीने सुरू आहे आणि विकास दर कोरोना काळानंतरही चांगला आहे. उच्च वाढीचे कारण केवळ बेस इफेक्टच नाही तर 2020 मधील वाढीमध्ये लक्षणीय घट झाली होती, त्यानंतरही 2021 मध्ये भारताची वाढ इतर अनेक देशांपेक्षा चांगली राहिली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या 2020 आणि 2021 च्या जानेवारीच्या वाढीच्या आकड्यांवरून असे स्पष्ट दिसून येते की, इतर देशांच्या वाढीतील घसरणीपेक्षा भारताची वाढ अधिक चांगली आहे. ही वाढ चांगली असली तरी भारताच्या विकास दर मात्र मंदावला आहे.
कच्च्या तेलाच्या वेगवान वाढीवर परिणाम होईल
युक्रेनवर ओढावलेल्या संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर काही अंशी परिणाम होणार आहे. यावेळी आशिमा गोयल यांनी सांगितले की, ” भारतीय अर्थव्यवस्थेचा आर्थिक दर चांगला असला तरी कच्च्या तेलाच्या किंमती जर उंचावत राहिल्या तर आर्थिक वाढीमध्ये थोड्याफार फरकाने परिणाम होणार आहे.”
चालू विकास दर 8.9 टक्के राहण्याची अपेक्षा
आखिया खंडातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा दर यावर्षी 8.9 टक्के दराने वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा आर्थिक दर 2021 च्या 9.2 टक्के एवढा अंदाज व्यक्त करण्यात आला होता मात्र त्याच्या मानाने हा दर कमी आहे. मॉर्गन स्टॅन्ले यांनी 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षासाठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज 50 टक्क्यांनी कमी करून 7.9 टक्क्यांवर येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे किरकोळ महागाईचा अंदाज 6 टक्क्यांपर्यंत वाढला असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. संबंधित बातम्या
Gold Price : आठवड्याभरात सोन्याच्या भावात मोठी घट, चांदीची चमकही घटली
16 मार्चला फेडरल रिझर्व्हचा महत्त्वाचा निर्णय, बाजारावर दिसणार मोठा परिणाम