Inflation : भावा, कितीही नवस बोल, महागाईतून सूटका नाहीच, नवीन वर्षातही खिसा कापल्या जाणार, व्याज दर रडवणार..
Inflation : सर्वसामान्यांची येत्या काही महिन्यात महागाईच्या मगरमिठ्ठीतून सूटका होण्याची शक्यता धूसर आहे..
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बुधवारी, 7 डिसेंबर रोजी पाचव्यांदा रेपो दरात वृद्धी करण्याचा निर्णय घेतला. मे महिन्यापासून रेपो दरात (Repo Rate) वाढीचा ही प्रक्रिया काही थांबलेली नाही. महागाई (Inflation) कमी करण्यात आरबीआयच्या प्रयत्नांना म्हणावे तसे यश येत नसल्याने हा जालीम उपाय सुरु आहे. अर्थात या उपायांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. कर्जदारांच्या (Borrowers) हालअपेष्टांकडे कोणाचेच लक्ष नाही. त्याच्या खिशावर मे महिन्यापासून मोठा भार पडत आहे. भविष्यातही महागाईतून सूटका होण्याची कोणतीच चिन्हं नाहीत.
RBI ने यावेळी रेपो दरात 0.35 टक्के वा 35 बेसिस पॉइंटची कमाल वाढ केली आहे. यापूर्वी मे महिन्यात 40 बेसिस पॉइंटची आणि पुढे तीन वेळा 50-50 बेसिस पॉइंटची वाढ केली होती. मे महिन्यापासून आतापर्यंत आरबीआयने एकूण 2.25 टक्क्यांची वाढ केली आहे.
तर मग नवीन वर्षात तुम्हाला दिलासा मिळू शकतो का? तर याचे उत्तर नाही असेच आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट संकेत दिले आहे की, महागाई आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा रेपो दरात वाढ करण्याची तयारी सुरु आहे. महागाई आटोक्यात आणणे हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार नाही.
फेब्रुवारी महिन्यात आता पतधोरण समितीची (MPC) बैठक होईल. त्यात पुन्हा रेपो दरात वाढीची खलबत शिजतील. अर्थात आता 50 बेसिस पॉइंटची वाढ होणार नाही. ही वाढ 0.25 टक्के वा 25 बेसिस पॉइंटची असू शकते. असा अंदाज तज्ज्ञ वर्तवित आहेत. पण फेब्रुवारीत व्याजदर वाढतील हे निश्चित आहे.
आरबीआयने मे पासून ते आतापर्यंत रेपो दरात 190 बेसिस प्वॉईंट्सची वृद्धी केली आहे. आतापर्यंत रेपो दर 5.90% वर आला होता. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय रेपो दरात वाढ केली. आता रेपो दर 6.25 टक्क्यांवर पोहचला.
सप्टेंबर महिन्यात महागाईचा दर 7.41% होता. हा महागाई दर घसरला. ऑक्टोबर महिन्यात महागाई दराने मागील तीनही महिन्यांचे रेकॉर्ड बदलले. ऑक्टोबर महिन्यात महागाई दर घसरून 6.77% वर आला. खाद्यान्न आणि अन्नधान्यांच्या किंमती झाल्याचा हा परिणाम होता.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, देशात महागाई दर 6 टक्क्यांच्या खाली आणण्यासाठी सर्व कवायत सुरु आहे. महागाई आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु असले तरी पुढील वर्षात महागाई दरात वाढ अपेक्षित आहे.