Manappuram Finance : मणप्पुरम फयनान्सला साडेसतरा लाखांचा दंड, नियमांचे उल्लघन केल्याप्रकरणी आरबीआयची कारवाई
भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) आणखी एका फायनान्स संस्थेवर कारवाई करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मणप्पुरम फयनान्सवर (Manappuram Finance) कारवाई करण्यात आली आहे. संबंधित संस्थेला तब्बल 17 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) आणखी एका फायनान्स संस्थेवर कारवाई करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मणप्पुरम फयनान्सवर (Manappuram Finance) कारवाई करण्यात आली आहे. संबंधित संस्थेला तब्बल 17 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणे, प्रीपे पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स तसेच केवायसी नियमांचे उल्लंघ केल्याप्रकणी मणप्पुरम फयनान्सला दंड करण्यात आला आहे. या कंपनीचे मुख्यालय केरळमध्ये असून, या कंपनीचा व्यवसाय देशभरातील तब्बल 25 राज्यांमध्ये पसरला आहे. गेल्याच आठवड्यात नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेकडून चार सहकारी बँकांना (Cooperative Bank) चार लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. रिझव्ह बँक ही बँकांच्या नियमनासाठी वेळेवेळी नवे नियम तयार करत असते. बँका नियमांचे पालन करतात की नाही, यावर आरबीआयची करडी नजर असते. ज्या बँका नियमांचे उल्लंघन करतात त्यांच्यावर आरबीआय दंडात्मक कारवाई करते, काही प्रकरणात तर बँकेचा परवाना देखील रद्द केला जातो.
रिझर्व्ह बँकेने काय म्हटले?
पेमेंट सेटलमेंट सिस्टीम कायदा 2007 च्या कलम 30 अंतर्गत मणप्पुरम फयनान्सवर दंडात्मक कारवाई करण्याची आल्याची माहिती आरबीआयकडून देण्यात आली आहे. पेमेंट अँड सेटलमेंट संदर्भात आरबीआयकडून बँका, तसेच खासगी पतसंस्थांना काही नियम घालून देण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास आरबीआयकडून संबंधित संस्थेवर कारवाई करण्यात येते. या प्रकरणात प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (पीपीआय) जारी करणे आणि ऑपरेशन्सशी संबंधित काही नियम आणि केवायसी मानदंडांचे पालन न केल्याबद्दल कंपनीला 17,63,965 रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती आरबीआयच्या वतीने देण्यात आली आहे. दंड ठोठावण्यापूर्वी आरबीआयकडून संबंध संस्थेला कारणे दाखवा नोटीस देखील पाठवण्यात आली होती. मात्र मणप्पुरम फयनान्सने नियमाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली.
ग्राहकांच्या व्यवहारांवर परिणाम नाही
दरम्यान याबाबत बोलताना आरबीआयच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, मणप्पुरम फयनान्स या संस्थेने नियमांचे उंल्लघ केल्याप्रकणी ही कारवाई करण्यात आली आहे. याचा ग्राहकांच्या व्यवहारावर कोणताही परिणाम होणार नाही, ग्राहकांचे व्यवहार सुरळीत सुरू राहातील. यापूर्वी देखील आरबीआयकडून अनेक बँकांवर अशी कारवाई करण्यात आली आहे. गेल्याच आठवड्यात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकणी चार सहकारी बँकांवर कारवाई करण्यात आली होती.
संबंधित बातम्या
Inflation: सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका; पुढील महिन्यात एसी, फ्रीजचे दर देखील वाढणार?