RBI Gold Update | कामगिरी सोन्यावाणी! आरबीआयने केली इतकी सोने खरेदी

RBI Gold Update | अनेक केंद्रीय बँकांकडे सोन्याचा भरगच्च साठा आहे. त्याच्यांकडे सोन्याचा मोठा खजिना आहे. अनेक देशातील बँकांनी त्यांचे सोने दुसऱ्या देशात ठेवले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या सप्टेंबर महिन्यात पण मोठी सोने खरेदी केले आहे. आता आरबीआयकडे इतके टन सोने झाले आहे. कोरोनानंतर आरबीआयने सोन्याचा साठा वाढवला आहे.

RBI Gold Update | कामगिरी सोन्यावाणी! आरबीआयने केली इतकी सोने खरेदी
Follow us
| Updated on: Oct 08, 2023 | 7:27 PM

नवी दिल्ली | 8 ऑक्टोबर 2023 : भारतीय रिझर्व्ह बँकेने ( RBI ) सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली. भारतीय सोन्याचा साठा सातत्याने वाढत आहे. कधीकाळी सोने की चिडिया असलेला भारत आक्रमणामुळे अनेकदा लुटल्या गेला. या परदेशी दरोडखोरांनी अनेक टन सोने पळवून नेले. स्वतंत्र भारतात आरबीआयने मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा सुरु केला आहे. कोरोना काळानंतर केंद्रीय बँकेने मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले. रिझर्व्ह बँकेने यंदा जानेवारी ते मार्च या तिमाहीत सोने खरेदीत (Gold Buying) नवीन रेकॉर्ड तयार केला आहे.कधी काळी सोने गहाण ठेवण्याची नामुष्की ओढावलेल्या आरबीआयने आता जगात आपला पाच का दम दाखवला आहे.

आरबीआयचा खरेदीत रेकॉर्ड

जगावर आर्थिक संकटाच्या खाईत जात आहे. रशिया-युक्रेन यु्द्ध आणि आता इस्त्राईलवर पॅलेस्टाईनने हल्ला चढवला आहे. त्यामुळे सोने आयात वाढवली. यावर्षीचा विचार केला तर जानेवारी ते मार्च या तिमाहीत आरबीआयने मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली. आरबीआयने या तिमाहीत जवळपास 10 टन सोने खरेदी केले.

हे सुद्धा वाचा

सप्टेंबर महिन्यात इतकी सोने खरेदी

आरबीआयने या सप्टेंबर महिन्यात 7 टन सोने खरेदी केले. गेल्या 14 महिन्यातील ही सर्वाधिक सोने खरेदी आहे. जुलै 2022 मध्ये जवळपास 13 टन सोने खरेदी करण्यात आले होते. केंद्रीय बँकेकडे आता एकूण 807 टन सोन्याचा साठा झाला आहे. ऑगस्ट महिन्यात आरबीआयने 2 टन सोन्याची खरेदी केली होती. पण हा साठा सातत्याने वाढत असल्याचे आकडेवारीवरुन समोर येत आहे.

असा वाढला ग्राफ

भारतीय रिझर्व्ह बँकेने यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर या महिन्यात एकूण 19.2 टन सोने खरेदी केले. नोव्हेंबर 2009 मध्ये बँकेने 200 टन सोन्याची खरेदी केली होती. मोठ्या प्रतिक्षेनंतर मार्च 2018 पासून आरबीआयने सोन्याची खरेदी सुरु केली. आतापर्यंत या पाच वर्षांत भारतीय रिझर्व्ह बँकेने जवळपास 250 टन सोने खरेदी केले.

भारताचा क्रमांक कितवा

भारताच्या केंद्रीय बँकेचा सर्वाधिक सोने असलेल्या इतर देशांच्या बँकांमध्ये अग्रक्रम आहे. चीनच्या केंद्रीय बँकेने या ऑगस्ट महिन्यात 29 टन सोने खरेदी केले आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात चीनच्या केंद्रीय बँकेने 155 टन सोन्याची खरेदी केली. या बँकेकडे एकूण 2165 टन सोने आहे. या ऑगस्ट महिन्यात पोलंडच्या केंद्रीय बँकेने 18 टन तर तुर्कीच्या केंद्रीय बँकेने 15 टन सोने खरेदी केली. या सुवर्णसाठ्यात आरबीआयचा 9 वा क्रमांक आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.