Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशभरामधील सात शहरातील आलिशान गृहप्रकल्पांना घरघर ! 4.48 लाख कोटींचे 4.8 लाख घरांचे प्रकल्प अडकले; एकटया मुंबई परिसरातील 1,28,870 गृहप्रकल्पांना फटका

गृहप्रकल्पांची मागणी उच्चांकी पातळीवर असली तरी गेल्या पाच महिन्यांत प्रकल्प उभारणीच्या कच्च्या मालाच्या किंमती गगनाला भिडल्याने देशभरातील सात मोठया शहरांतील आलिशान गृहप्रकल्पांना घरघर लागली आहे. 4.48 लाख कोटींचे 4.8 लाख गृह प्रकल्प त्यामुळे अडकले आहेत अथवा पूर्णत्वास विलंब होत आहे. एकटया मुंबई परिसरातील 1 लाख 28 हजार 870 प्रकल्पांना याचा फटका बसला आहे.

देशभरामधील सात शहरातील आलिशान गृहप्रकल्पांना घरघर ! 4.48 लाख कोटींचे 4.8 लाख घरांचे प्रकल्प अडकले; एकटया मुंबई परिसरातील 1,28,870 गृहप्रकल्पांना फटका
घरांना घरघरImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 5:09 PM

मुंबईः गृह प्रकल्पांना(Home Project) ही महागाईच्या झळा बसल्या आहेत. प्रकल्प एकतर पाईपलाईनमध्ये अडकले आहेत वा सिमेंट, सळई, वाळू, खडी, विटा,चुना,पत्रे, रंग या बांधकाम साहित्यासह इतर पुरक सेवा महागल्या आहेत. त्याचा थेट परिणाम देशातील बांधकाम क्षेत्राला (Real Estate) बसला आहे. गृहप्रकल्पांची मागणी उच्चांकी पातळीवर असली तरी गेल्या पाच महिन्यांत प्रकल्प उभारणीच्या कच्च्या मालाच्या (Raw Materials) किंमती गगनाला भिडल्याने देशभरातील सात मोठया शहरांतील आलिशान गृहप्रकल्पांना घरघर लागली आहे. 4.48 लाख कोटींचे 4.8 लाख गृह प्रकल्प त्यामुळे अडकले आहेत अथवा पूर्णत्वास विलंब होत आहे. एकटया मुंबई परिसरातील (Mumbai Metropolitan Region) 1 लाख 28 हजार 870 प्रकल्पांना याचा फटका बसला आहे. महागाईचा सामना करत विकासकांनी 37 हजार युनिट्स पूर्ण केले आहेत, याविषयीची माहिती या क्षेत्रातील सल्लागार संस्था अनरॉक (Anarock) यांनी दिली आहे.

या संशोधनासाठी Anarock ने 2014 आणि त्यापूर्वी सुरु झालेल्या गृहप्रकल्पांचा समावेश केला आहे. दिल्ली-एनसीआर, मुंबई महानगर विभाग, कोलकत्ता, चेन्नई, बेंगळुरु, हैदराबाद आणि पुणे या मोठया शहरांची निवड केली होती. उपलब्ध आकडेवारीनुसार, या काळात 36,830 रंगाळलेल्या प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी विकासकांनी पुढाकार घेतला. जानेवारी 2022 ते मे 2022 या दरम्यान या रेंगाळलेल्या प्रकल्पकांना नवसंजीवनी मिळाली. या मे महिन्याच्या शेवटी या सात शहरातील 4 लाख 48 हजार 129 कोटींच्या 4 लाख 79 हजार 940 युनिट्सची बांधकामं रखडली. बांधकाम क्षेत्रातील गती मंदावल्याचे हे द्योतक आहे. सरत्या वर्षात 4.84 लाख कोटींच्या 5.17 लाख युनिट्सच्या बांधकामावर विपरीत झाला.

बांधकाम व्यावसायिक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहेत. तसेच पूर्ण झालेल्या प्रकल्पांची मागणी ही वाढलेली आहे, असे अनरॉकचे प्रमुख आणि वरिष्ठ संचालक प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. बांधकाम व्यावसायिक रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

एनसीआरनंतर एमएमआरमध्ये प्रकल्पाचे गाडे रुतले

दिल्ली-एनसीआरमध्ये 16,750 युनिट्स जानेवारी ते मे 2022 दरम्यान पूर्ण करण्यात आले आहे. तर दिल्ली-एनसीआरमध्ये 1 लाख 81 हजार 410 कोटींचे 2 लाख 40 हजार 610 बांधकाम प्रकल्पांना फटका बसला आहे. तर मुंबई महानगर विभागातील 1 लाख 84 हजार 226 कोटी रुपयांचे 1 लाख 28 हजार 870 प्रकल्प रखडले आहेत. या विभागातील 5,300 प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहे. तर पुणे शहराचा विचार करता, या मे महिन्याच्या अखेरीस 27,533 कोटींच्या 44,250 युनिट्सला घरघर लागली आहे. गेल्या वर्षाच्या शेवटी या शहरात 35,220 कोटींचे 48,100 गृहप्रकल्पांना फटका बसला होता. असे असले तरी विकासकांनी पुणे शहरात या जानेवारी ते मे महिन्यादरम्यान 3,850 प्रकल्प पूर्ण केले आहेत.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.