AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price Today : रशियाकडून कच्चा तेलाची रेकॉर्डब्रेक आयात! लवकरच इंधनाच्या किंमतीत कपात?

Petrol Diesel Price Today : एका वर्षातच रशियाकडून कच्चा तेलाची आयात करण्यात भारताने नवा विक्रम नोंदवला. 1 टक्क्यांपेक्षा कमी आयात करणारा भारत आता रशियाच्या गळ्यातील ताईत झाला आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलची स्वस्ताई येऊ शकते.

Petrol Diesel Price Today : रशियाकडून कच्चा तेलाची रेकॉर्डब्रेक आयात! लवकरच इंधनाच्या किंमतीत कपात?
आजचा भाव
| Updated on: Feb 25, 2023 | 8:35 AM
Share

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत सातत्याने चढउतार होत आहे. पण मोदी सरकारच्या खेळीमुळे भारताचा मोठा फायदा झाला आहे. रशिया-युक्रेन युद्धात (Russia-Ukraine War) अनेक देशात कच्चा इंधनाने खेळ बिघडवला. या देशातील अर्थव्यवस्थेला कच्चा तेलाने उद्धवस्त केले. पण मोदी सरकारने अशावेळी रशियाकडून कच्चा तेलाची आयात वाढवली. रशियाचे क्रूड ऑईल (Russian Crude Oil) भारताला अत्यंत कमी किंमतीत मिळत आहे. रशिया-युक्रेन युद्धापूर्वी 1 टक्क्यांपेक्षा कमी कच्चा इंधनाची आयात होत होती. आता भारत 28 टक्के कच्चे तेल रशियाकडून घेत आहे. जानेवारीत भारताने प्रत्येक दिवशी 1.27 दशलक्ष बॅरल तेलाची रशियाकडून आयात केली. गेल्यावर्षी याच महिन्यात भारताचा वाटा केवळ 0.2 टक्के इतका होता. रशिया स्वस्तात कच्चा तेलाचा पुरवठा करत आहे. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलची स्वस्ताई (Petrol-Diesel Price) येऊ शकते.

आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या 24 तासात कच्चा तेलाचे भाव (Crude Oil Price) पुन्हा वधारले. ब्रेंट क्रूड ऑईलचा भाव आज 83.16 डॉलर प्रति बॅरल झाले. तर डब्ल्यटीआई ऑईलमध्ये 1.23 टक्क्यांची वाढ होऊन ते 76.32 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले आहे. भारत रशियासह इतर देशांकडून कच्चा तेलाची खरेदी करत आहे. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे.

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी सहा वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

  1. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 22 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती.
  2. देशात गेल्यावर्षी 21 मे रोजीनंतर इंधनाच्या किंमती मोठा बदल दिसून आला.
  3. पेट्रोलवर प्रति लिटर 8 रुपये तर डिझेलवर प्रति लिटर 6 रुपयांची कपात झाली.
  4. त्यानंतर काही राज्यांनी ही त्यांच्या मूल्यवर्धित करात (Value Added Tax-VAT) कपात केली होती.
  5. हिमाचल प्रदेश सरकारने यावर्षीच्या सुरुवातीला डिझेलवर 3 रुपये व्हॅट लावला.
  6. पंजाब सरकारने पेट्रोल-डिझेलवर प्रति लिटर 90 पैसे सेस लावला.
  7. केरळचे अर्थमंत्री के एन बालगोपाल यांनी पेट्रोल-डिझेलवर 2 रुपये प्रति लिटर सामाजिक सुरक्षा उपकर (Cess) लावला.
  8. पेट्रोल आणि डिझेल कमी किंमतीत विक्री केल्याने 21,200 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तेल कंपन्यांची ओरड आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.