Reliance Share | रिलायन्सचा बाजारात धमाका! लवंगी नाही सुतळी बॉम्ब फोडणार
Reliance Share | रिलायन्स गुंतवणूकदारांना लवकरच लॉटरी लागण्याची दाट शक्यता आहे. त्यांना आता दिवाळी दुप्पट आनंदाची ठरेल. रिलायन्स लवंगी नाही तर सुतळी बॉम्ब फोडण्याच्या तयारीत आहे. रिलायन्सवर गुंतवणूकदारांचाच नाही तर जागतिक संस्थांनी पण भरवसा दाखवला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना आतापासूनच आनंदाच्या उकळ्या फुटत आहे.
नवी दिल्ली | 5 नोव्हेंबर 2023 : तुमच्याकडे रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर आहे का? अथवा हा शेअर घेण्याची तयारीत आहात का? मग ही बातमी तुमच्यासाठीच. या शेअरविषयी बाजारात भाकित करण्यात येत आहे. हा शेअर लवंगी नाहीतर सुतळी बॉम्ब फोडेल असा विश्वास गुंतवणूकदारांनाच नाही तर बाजारातील तज्ज्ञांना वाटतो. बाजारातील खेळाडू, हा शेअर त्यांच्या पोर्टफोलिओत नक्की ठेवतात. 10 वर्षांपूर्वी हा शेअर 400 रुपयांवर होता. सध्या या शेअरमध्ये पडझड सुरु आहे. हा शेअर शुक्रवारी 2,319 रुपयांवर बंद झाला. गेल्या दहा वर्षांत हा शेअर किती पट वाढला हे या आकड्यांवरुन समोर येत आहे.
तिमाहीने आशा पल्लवीत
रिलायन्सने दुसऱ्या तिमाहीचे निकाल घोषीत केले आहे. निकालानंतर शेअरमध्ये दोन टक्क्यांची उसळी दिसून आली. शेअरने 2,319 रुपयांपर्यंत झेप घेतली आहे. अनेक ब्रोकरेज हाऊस या स्टॉक बाबत आग्रही आहेत. त्यांनी रिलायन्सच्या पारड्यात वजन टाकले आहे. त्यामुळे हा शेअर येत्या काळात मोठा पल्ला गाठणार असा अंदाज आहे.
ब्रोकरेज हाऊस फिदा
- ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांच्या मते हा शेअर 2760 रुपयांपर्यंत उसळी घेऊ शकतो
- दुसऱ्या एका ब्रोकरेज हाऊसने हा शेअर 2900 रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला आहे
- आयसीआयसीआय सिक्युरिटीज यांच्या मते हा शेअर 2500 रुपयांची मजल मारेल
- ग्लोबल ब्रोकरेज हाऊस नोमूराने रिलायन्सचा शेअर 2925 रुपयांच टप्पा गाठण्याचा अंदाज वर्तवला आहे
- एचएसबीसीने हा शेअर होल्ड ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
निकालाने आणली तेजी
आता या ब्रोकरेज हाऊसने जोरदार रेटिंग का दिले आहे आणि रिलायन्सचा शेअर अजून मोठा पल्ला गाठणार असे का सांगितले, यामागे एक कारण आहे. रिलायन्सचे तिमाही निकाल आशादायक आहे. अनेक मोठंमोठे ब्रँड रिलायन्सच्या पंखाखाली येत आहे. रिलायन्स रिटेलने तर ब्रँड खरेदीचा धमाकाच सुरु केला आहे. गेल्या काही महिन्यात देशातील आणि परदेशातील अनेक ब्रँड एकतर खरेदी करण्यात आले आहे, अथवा त्यात मोठा हिस्सा खरेदी करण्यात आला आहे.
जोरदार कामगिरी
रिलायन्सने 2024 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जोरदार कामगिरी दाखवली. या कंपनीचा व्यावसायिक नफा वार्षिक आधारावर चांगला राहिला आहे. उर्वरीत तिमाहीत कंपनी अजून मोठी झेप घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कंपनीचे अनेक प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये आहे. ते बाजारात उतरल्यावर मोठा धमका होईल. यावर्षात कंपनीला 16011 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.