Salon : मुकेश अंबानी आता उघडणार सलून..हा ब्रँड लवकरच रिलायन्स समुहाच्या ताफ्यात..

Salon : रिलायन्स समूह आता सलून व्यवसायातही उडी घेणार आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Salon : मुकेश अंबानी आता उघडणार सलून..हा ब्रँड लवकरच रिलायन्स समुहाच्या ताफ्यात..
रिलायन्स सलून उद्योगातImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 04, 2022 | 10:06 PM

नवी दिल्ली : टेलिकम्युनिकेशनसह, नॅचरल गॅस, पेट्रोल पंप, खनिज यासह आता आता किराणा, इलेक्ट्रॉनिक्स अशा सर्वच क्षेत्रात रिलायन्स समूह (Reliance Group) हातपाय पसरवत आहे. पण आता या समुहाने आणखी एक कमाल केली आहे. हा समूह लवकरच सलून व्यवसायतही उडी घेत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात तुम्हाला केस कापायचे असतील अथवा चेहरा निखरायचा असेल तर रिलायन्सच्या सलूनमध्ये (Reliance Salon) या सुविधांचा लाभ घेता येईल.

भारतात सर्वात मोठ्या असलेल्या रिटेल चेन रिलायन्स रिटेल आता सलून इंडस्ट्रीतही नाव कोरणार आहे. या क्षेत्रात उतरण्यासाठी रिलायन्स रिटेल चेन्नईतील नॅचरल्स सलून अँड स्पा या ग्रुपमध्ये 49 टक्क्यांची हिस्सेदारी खरेदी करेल.

या उद्योगात पाऊल ठेवण्यासाठी रिलायन्स रिटेल आणि नॅचरल्स सलून अॅंड स्पा यांच्यामध्ये चर्चा सुरु आहे. या चर्चनंतर पुढील घडामोडींना वेग येणार आहे. त्यानंतर या क्षेत्रात रिलायन्स दबदबा राहिल.

हे सुद्धा वाचा

नॅचरल्स ग्रुपचे भारतात 650 हून अधिक सलून आहे. नॅचरल्स सलून अँड स्पाची सुरुवात 2000 साली सुरुवात झाली. 2025 मध्ये 3,000 पर्यंत सलून विस्तार करण्याची योजना या कंपनीची आहे.

रिलायन्स या क्षेत्रात उतरल्यावर त्यांचे इतर मोठ्या ब्रँड्ससोबत स्पर्धा करावी लागणार आहे. लॅक्मेसह इतर अनेक कंपन्या या क्षेत्रात आहे. आता त्यात रिलायन्स इंडस्ट्री उडी मारणार आहे.

रिलायन्स रिटेल ने आतापर्यंत नॅचरल्समध्ये 49 टक्क्यांची हिस्सेदारी अधिग्रहित केली नसल्याचे नॅचरल्सने निवेदनात स्पष्ट केले आहे. कंपनी सध्याच्या एकूण 700 सलूनच्या पुढे आणखी सलून वाढविण्याच्या तयारीत आहे. ही वाढ 4-5 पटीने अधिक असेल,असा दावा कंपनीने केला आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.