Reliance Retail : रिलायन्समध्ये धन धना धन! असा धावत आला पैसा
Reliance Retail : Reliance Retail Venture Limited या कंपनीला जॅकपॉट लागला आहे. तिला मोठा फंड मिळाला आहे. लक्ष्मी चालत आल्याने ईशा अंबानी हिच्यासमोरील अडचणीचा मोठा डोंगर कमी होणार आहे. रिलायन्समध्ये धन धना धन सुरु झाल्याने आता अनेक प्रकल्पांना गती येईल. गुंतवणूकदारांना पण फायदा होईल.
नवी दिल्ली | 7 ऑक्टोबर 2023 : रिलायन्स रिटेल व्हेंटर लिमिटेड (Reliance Retail Venture Limited) कंपनीला जॅकपॉट लागला आहे. या कंपनीची जबाबदारी सध्या ईशा अंबानी (Isha Ambani) हिच्याकडे आहे. या कंपनीत सर्वाधिक घडमोडी घडत आहे. थेट जनतेशी संबंधीत उत्पादनं पोहचविण्याचे काम या कंपनीमार्फत होते. या कंपनीवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. अनेक ब्रँड खरेदी करण्याचा सपाटाच रिलायन्स रिटेलने सुरु केला आहे. अनेक कंपन्या त्यांच्या पंखाखाली आल्या आहेत. देशातच नाही तर परदेशात ही कंपनीचा जोमात पसारा वाढत आहे. तिथले पण जागतिक ब्रँड रिलायन्समध्ये दाखल होत आहे. या सर्व घडामोडींसाठी भांडवल लागते. गरजेच्यावेळी रिलायन्समध्ये या मोठ्या संस्थेने गुंतवणूक केली आहे.
ADIA ची मोठी गुंतवणूक
अबू धाबी गुंतवणूक प्राधिकरणाने (Abu Dhabi Investment Authority) 4,966.80 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी आहे. इतक्या मोठ्या गुंतवणुकीमुळे या कंपनीचे भांडवल वाढले आहे. तीचे इक्विटी मूल्य 8.381 लाख कोटी रुपये झाले आहे. या भांडवलाच्या आधारावर ही भारतातील चौथी मोठी कंपनी ठरली आहे. ADIA ची ही गुंतवणूक 0.59% इतकी आहे. या घडामोडींचा परिणाम रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरवर दिसून आला. शुक्रवारी रिलायन्सचा स्टॉक 0.18 टक्क्यांनी वधारला. हा शेअर बीएसईवर 2,317.90 रुपयांवर बंद झाला.
18,000 स्टोअरचा पसारा
रिलायन्स रिटेल यांच्याकडे एकूण 18,000 स्टोअरचा पसारा आहे. तर आता त्यांनी इंग्लंडमधील रिटेल ब्रँड सुपरड्राय पण पंखा खाली घेतले आहे. त्यात सुपरड्रायचा वाटा 24% तर रिलायन्सचा शेअर 76% आहे. या वृत्तानुसार कंपनी श्रीलंका, बांगलादेशसह इतर देशात तिथल्या ब्रँडसोबत संयुक्त उपक्रमाचा कार्यक्रम सुरुच ठेवणार आहे. यातंर्गत इतर ब्रँड रिलायन्समध्ये दाखल होऊ शकतात.
आलिया भटची कंपनी ताब्यात
रिलायन्स रिटेल हा भारतातील सर्वात मोठा ब्रँड म्हणून उदयास आला आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट हिच्या लहान मुलांसाठीच्या फॅशन ब्रँडमध्ये रिलायन्सने 51 टक्क्यांची खरेदी केली आहे. Ed-a-Mamma हा ब्रँड सप्टेंबर महिन्यात रिलायन्स रिटेलमध्ये दाखल झाला. Reliance Brands 2007 मध्ये स्थापन झाला. या कंपनीने 50 जागतिक ब्रँडसोबत करार केला आहे. देशात त्यांचे 2,000 हून अधिक स्टोअर आहेत. रिलायन्स रिटेल व्हेंचर लिमिटेडचा टर्नओव्हर 2.60 लाख कोटी रुपयांच्या घरात आहे.