AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mukesh Ambani : रिलायन्स होणार बलाढ्य! बँकिंग सेक्टरमध्ये आता येणार जिओची लाट, तुमचा फायदा काय होणार

Mukesh Ambani : बँकिंग सेक्टरमध्ये धुमाकूळ घालण्यास रिलायन्स ग्रुप सज्ज झाला आहे. तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आता मुकेश अंबानी हे त्यांच्या या ग्रुपचा विस्तार करणार आहेत.

Mukesh Ambani : रिलायन्स होणार बलाढ्य! बँकिंग सेक्टरमध्ये आता येणार जिओची लाट, तुमचा फायदा काय होणार
| Updated on: Apr 08, 2023 | 4:42 PM
Share

नवी दिल्ली : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) लवकरच देशातील बँकिंग सेक्टरमध्ये धुमाकूळ घालणार आहे. तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी रिलायन्स ग्रुप (Reliance Group) आता त्यांच्या आर्थिक सेवेचा विस्तार करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज त्यांची आर्थिक सेवा पुरविणारी, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस (Jio Financial Services) ही कंपनी लवकरच शेअर बाजारात सूचीबद्ध करणार आहे. त्यामुळे रिलायन्सच्या शेअरमध्ये तेजी येणार आहे. त्याचा ग्राहकांना मोठा फायदा होईल. पण ही केवळ साधी आर्थिक सेवा देणारी संस्था नसेल. तर ही देशातील 5 वी मोठी बँका ठरणार आहे.

वार्षिक बैठकीत घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या आर्थिक व्यवसायाची एक स्ट्रॅटर्जी ठरवली होती. त्यासाठी एक स्वतंत्र कंपनी गठित करण्याची घोषणा केली होती. आता कंपनी यावर्षी वार्षिक सर्वसाधारण बैठकीत जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेससंबंधीची स्ट्रॅटर्जीची घोषणा करु शकते.

भारतातील 5 वी मोठी बँक जेफरीजच्या दाव्यानुसार, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसचे मार्केट व्हॅल्यूएशन 90,000 ते 1.5 लाख कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. नवीन कंपनीच्या शेअरची किंमत 179 रुपयांच्या जवळपास असेल. तर मॅक्युरी रिसर्चनुसार, नवीन कंपनी झाल्यानंतर जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस देशातील आर्थिक क्षेत्रातील 5 वी मोठी बँका असेल. एचडीएफसी बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक आणि ॲक्सिस बँक यानंतर जिओचा क्रमांक असेल. यंदा एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी या दोघांचे विलिनीकरण होणार आहे. या विलिनीकरणानंतर एचडीएफसी बँक देशातील सर्वात मोठी फायनान्स कंपनी ठरेल.

बजाज, पेटीएम, फोनपेला टक्कर ॲनलिस्ट कंपनी जेफरीजच्या दाव्यानुसार, येत्या काही दिवसांत जिओ फायनान्शिअल सर्व्हिस बाजारात धुमाकूळ घालेल. ही कंपनी बाजारातील सध्याचे स्पर्धक बजाज फायनान्स, पेटीएम, फोनपेला जोरदार टक्कर देईल. जिओचे नेटवर्थ सर्वाधिक असल्याने बँकिंग सेक्टरमध्ये जिओ आता पाचव्या स्थानावर असेल. याआधारे जिओ फायनान्शिअल सर्व्हिस पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा यांनाही मागे टाकेल.

रिलायन्स कुटुंबातील ग्राहकांना मोठा फायदा रिलायन्स कुटुंबातील ग्राहकांना या सेवेचा मोठा फायदा होईल. त्यांना आता कर्जासाठी, रिलायन्स स्टोअरमधील किंमती वस्तू खरेदीसाठी दुसऱ्या बँकेचे, आर्थिक सेवा पुरवठादारांची मदत घेण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यांना एकाच छताखाली सर्व सुविधा मिळतील. जानेवारी 2023 नुसार, जिओ टेलिकॉमकडे जवळपास 42.6 कोटी ग्राहक आहेत. त्यांना आर्थिक सेवांचा लाभ मिळेल. कदाचित त्यांच्यासाठी मोठी ऑफर असेल.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.