RBI | महागाई सणाचाही आनंद हिरवणार..भारतीयांचा येणारा काळ कठीण..
RBI | महागाई सणाचाही आनंद हिरवणार असल्याचे चित्र आहे. एका सर्वेक्षणात रिझर्व्ह बँकेच्या एका पावलामुळे भारतीयांचा खिसा खाली होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
नवी दिल्ली : देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी बातमी नक्कीच चांगली नाही. जगातील मोठी वृत्तसंस्था रॉयटरने (Reuters) भारतात सर्वेक्षण केले असता, त्यात भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियांच्या (Reserve Bank of India)धोरणामुळे पुन्हा महागाई वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
RBI पुढील आठवड्यात व्याजदर वाढवण्याची (Interest Rate Hike) शक्यता आहे. रॉयटर्सच्या पोलमध्ये अर्थशास्त्रज्ञांनी रेपो रेट (Repo Rate Hike) मध्ये 0.50 टक्क्यांच्या वाढीचा अंदाज वर्तवला आहे. तर काही अर्थतज्ज्ञांच्या मते, आरबीआय रेपो दरात 35 आधार अंकाची वाढ करेल.
अंदाज वर्तवण्यात येत आहे की, आरबीआय, 30 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत व्याजदर वाढीची घोषणा करेल. महागाई आटोक्यात आणण्यासाठी बँकेला रेपो दरात वाढीशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.
या वर्षात आरबीआयने व्याजदरात 1.40 टक्क्यांची वाढ केली आहे. यापूर्वी झालेल्या दोन बैठकांमध्ये मध्यवर्ती बँकेने 50 बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. त्यामुळे यावेळीही व्याजदर वाढीची आशंका आहे. महागाईचा दर 7 टक्के आहे. तो केंद्रीय बँकेच्या निर्धारीत दरापेक्षा अधिक आहे.
या सर्वेक्षणातील अर्धांहून अधिक तज्ज्ञांनी आरबीआय रेपो दरात 50 आधार अंकांची वृद्धी करेल असा अंदाज व्यक्त केला आहे. या सर्वेक्षणातील बाबी लक्षात घेता, सर्वांचा जोर हा व्याजदर वाढीवर असल्याचे समोर आले. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेनेही व्याजदर वाढवले आहेत. त्याचा परिणामही दिसून येत आहे.
आरबीआयने व्याजदर वाढवल्यास महागाईने सर्वसामान्यांची कंबर तुटल्याशिवाय राहणार नाही. आरबीआयच्या या धोरणामुळे बँकाही व्याजदर वाढवतील. गृह, वाहन आणि इतर कर्जावरील व्याजदर वाढेल. जास्त ईएमआयचा बोजा लोकांच्या खिशावर पडेल. बचत सोडा, खर्चाची जुळवाजुळव करताना त्यांची बिकट परिस्थिती होईल.