Elon Musk ची श्रीमंतीत मोठी भरारी; संपत्ती 2,96,60,79,07 लाखांवर

Elon Musk Net worth : जागतिक श्रीमंत आणि उद्योगपती एलॉन मस्क याने अजून एक विक्रम नावावर केला आहे. त्याच्या श्रीमंतीत अजून भर पडली. त्याची एकूण संपत्ती 2,96,60,79,07 लाख रूपयांपेक्षा अधिक झाली आहे. सोमवारी टेस्लाच्या शेअरमध्ये मोठी उसळी आल्यानंतर मस्कने इतिहास रचला.

Elon Musk ची श्रीमंतीत मोठी भरारी; संपत्ती 2,96,60,79,07 लाखांवर
एलॉन मस्क याची श्रीमंतीत भरारी
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 11:21 AM

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क याने श्रीमंतीत आता मोठी भरारी घेतली आहे. त्याच्या या भरारीमुळे त्याच्याजवळ पोहचण्याची कोणाचीच पत राहिली नाही. एलॉन मस्क याची एकूण संपत्ती 350 अब्ज डॉलर, भारतीय रूपयात 2,96,60,79,07 लाखांपेक्षा अधिक झाली आहे. इतिहासात असे पहिल्यांदाच झाले आहे. जेव्हा एखाद्या अब्जाधीशाची संपत्ती ऐतिहासिक उंचीवर पोहचली आहे. ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्सच्या ताज्या आकडेवारीनुसार, एलॉन मस्क यांच्या संपत्तीत 10 अब्ज डॉलरची नव्याने भर पडली आहे.

या वर्षभरात 124 अब्ज डॉलरची भर

या वर्षभरात मस्क याच्या संपत्तीत 124 अब्ज डॉलरची भर पडली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकल्यापासून मस्क याच्या संपत्तीत मोठी भर पडल्याचे दिसत आहे. या नवीन अपडेटनुसार, ट्रम्प विजयी झाल्यापासून आतापर्यंत त्याच्या संपत्तीत 89 अब्ज डॉलरची भर पडली आहे. विशेष म्हणजे एलॉन मस्क याची कंपनी टेस्लाच्या शेअरमध्ये 4 नोव्हेंबरपासून 47 टक्क्यांहून अधिकची वाढ नोंदवली गेली आहे.

हे सुद्धा वाचा

Elon Musk ने रचला इतिहास

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांच्या संपत्तीत मोठी वाढ दिसून आली. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, त्याची संपत्ती आता 353 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. आतापर्यंत इतिहासात कोणत्याच उद्योगपतीला असा इतिहास रचता आलेला नाही. मस्क याने स्वत:चाच विक्रम मोडीत काढला आहे. यापूर्वी त्याने 300 अब्ज डॉलरचा टप्पा 2021 मध्ये ओलांडला होता. यावेळी तसा विक्रम त्याने नोव्हेंबर 2024 मध्ये केला. तर त्याची घौडदौड अशीच कायम राहिल्यास मस्क लवकरच 400 अब्ज डॉलरचा क्लबमध्ये दाखल होणारा जगातील एकमेव अब्जाधीश ठरेल.

टेस्लाच्या शेअरमध्ये तेजीचे वारे

टेस्ला कंपनीच्या शेअरमध्ये बंपर तेजीचे सत्र आले आहे. सोमवारी टेस्लाच्या शेअरमध्ये 3.46 टक्क्यांची तेजी दिसून आली. कंपनीचा शेअर आता 357.09 डॉलरवर म्हणजे 30,263.20 रुपयांवर पोहचला आहे. तर 4 नोव्हेंबरपासून कंपनीचा शेअर 47 टक्क्यांपेक्षा अधिकने उसळला आहे. 4 नोव्हेंबर रोजी कंपनीचा शेअर 242.84 डॉलरवर व्यापार करत होता. या वर्षभरात टेस्लाच्या शेअरने गुंतवणूकदारांना 43.74 टक्के परतावा दिला आहे.

'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?.