मुकेश अंबानी यांचा सर्वात विश्वासू सहकारी ईशा यांचा मेंटॉर, वर्षाचा पगार बक्कळ; जबाबदारी कोणती ?

ईशा अंबानीची रिलायन्स रिटेल कंपनी ही मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या उपकंपन्यांपैकी एक आहे. रिलायन्स रिटेलचे सध्याचे मूल्यांकन 8.3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

मुकेश अंबानी यांचा सर्वात विश्वासू सहकारी ईशा यांचा मेंटॉर, वर्षाचा पगार बक्कळ; जबाबदारी कोणती ?
मुकेश आणि ईशा अंबानी
Follow us
| Updated on: Apr 05, 2024 | 11:20 AM

आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेले मुकेश अंबानी यांनी त्यांच्या तीनही मुलांना स्वतंत्र व्यवसाय देऊन मालक बनवले. मात्र, आपल्या मुलांना मदत करण्यासाठी मुकेश अंबानी सध्या व्यवसायात पूर्णपणे सक्रिय आहेत. आकाश अंबानी रिलायन्स जिओचे नेतृत्व करत आहे. तर रिलायन्स रिटेलचा संपूर्ण व्यवसाय ईशा अंबानीकडे आहे. तर मुकेश अंबांनी यांचा सर्वात धाकटा मुलगा अनंत अंबानी हा रिलायन्स एनर्जीचे नेतृत्व करत आहे. तसं पहायलं गेलं तर ईशा अंबानीची रिलायन्स रिटेल ही मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या उपकंपन्यांपैकी एक आहे. रिलायन्स रिटेलचे सध्याचे मूल्यांकन 8.3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

हे आहेत ईशाचे खरे मेंटॉर

रिलायन्स रिटेलच्या पार्टनर ब्रँडच्या रुपात वर्साची, अमीरी, अरमानी आणि अनेक आघाडीचे इंटरनॅशनल ब्रँड्स हे भारतात उपलब्ध आहेत. 2022 सालच्या ऑगस्ट महिन्यात रिलायन्स रिटेलच्या प्रमुख म्हणून ईशा अंबानीचे नाव मुकेश अंबानी यांनी जाहीर केले. तेव्हापासून, आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश यांच्या या लाडक्या लेकीने भारतात अनेक इंटरनॅशनल ब्रँड आणले केले आहेत. याशिवाय रिलायन्स ब्रँड्सचे बिझनेस हेड दर्शन मेहता यांनी कंपनीच्या माध्यमातून ईशा अंबानीला खूप मदत केली आहे. ते ईशा अंबानी हिचे मेंटॉर म्हणूनही समोर आले आहेत.

ईशाच्या प्रत्येक निर्णयामागे असतो यांचा सल्ला

आपल्या कंपनीला नवीन उंचीवर नेण्यासाठी हरप्रकार प्रयत्न करणारी ईशा ही तिचे वडील मुकेश अंबानी यांच्या पावलावर पाऊल टाकत आहे. उदाहरण सांगायचं झालं तर मुकेश अंबानी यांच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचे खास सहकारी किंवा कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे योगदान असते. तसेच ईशा अंबानी देखील कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी तिच्या विश्वासू लोकांशी बोलते आणि नंतरच निर्णय घेते. दर्शन मेहता हे ईशा अंबानीच्या सर्वात महत्त्वाच्या, विश्वासू व्यक्तींपैकी एक आहेत.

ते ईशा अंबानी हिचे जवळचे सहकारी म्हणूनही ओळखले जातात. विशेष बाब म्हणजे दर्शन मेहता हे मुकेश अंबानींच्या यांच्यादेखील जवळचे मित्र मानले जातात. ते रिलायन्स ब्रँडच्या पहिल्या कर्मचाऱ्यांपैकी एक आहेत. मुकेश अंबानी यांनी 2007 साली रिलायन्स रिटेलची सुरुवात केली. दर्शन हे त्या ब्रँडचे पहिले कर्मचारी होते.

किती आहे दर्शन यांचा पगार ?

रिटेल उद्योगात येण्यापूर्वी मेहता यांनी जाहिरात क्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती. रिपोर्ट्सनुसार, भारतीय बाजारपेठेत टॉमी हिलफिगर, गँट आणि नॉटिका सारखे ब्रँड आणण्यात मेहता यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कंपनीच्या फाइलिंगनुसार, दर्शन मेहता यांना 2020-21 आर्थिक वर्षासाठी 4.89 कोटी रुपये पगार मिळाला आहे. ईशा अंबानीच्या म्हणण्यानुसार, रिलायन्स रिटेलच्या यशात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, ज्यामुळे कंपनीने गेल्या वर्षी 3300 स्टोअर्स उघडली.

अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.