वडीलांचा वारसा चालवतोय, 2 लाख कोटीच्या आयटी फर्मचा चेअरमन, दिवसाचा पगार आहे 21 लाख
रिशद यांना क्रिकेट आवडत असून त्यांना पर्यटन आणि चित्रपट पहायला आवडते. एमबीए झाल्यानंतर त्यांनी दोन वर्षे त्यांनी मोठ्या कंपनीत काम केले.
मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : देशातील प्रतिष्ठीत उद्योगपतीमध्ये अझिम प्रेमजी, मुकेश अंबानी आणि एनआर नारायण मूर्ती यांचे नाव घेतले जाते. त्यांचा वारसा त्यांची पुढील पिढी चालविणार आहे. देशातील दिग्गज आयटी फर्म विप्रोचे अध्यक्ष अझिम प्रेमजी यांचा वारसा आता त्यांचा 46 वर्षांचा मुलगा रीशद प्रेमजी यांच्याकडे आहे. रिशद यांचे शिक्षण परदेशात झाले असून ते आता विप्रोचे चेअरमन बनले आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली विप्रो कंपनी आता पुढील वाटचाल करीत आहे.
रिशद प्रेमजी कोण आहेत
जुलै 2019 पासून 2.13 ट्रीलियन म्हणजेच 2.13 लाख कोटी रुपयांची मालमत्ता असलेल्या विप्रोचे आयटी कॉर्पोरेशनचे अध्यक्षपद सांभाळत आहेत. त्याआधी ते चिफ सेक्रेटरी ऑफीसर पदावर होते. रिशद यांनी मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन शाळेत शालेय शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी हावर्ड बिझनेस स्कूल मधून एमबीए आणि वेसलीयन युनिव्हर्सिटीतून इकॉनॉमिक्समधून बॅचलर डीग्री घेतली आहे. साल 2005 मध्ये त्यांचे त्यांची बालपणीची मैत्रीण आदितीशी लग्न झाले. त्यांना दोन मुले आहेत.
रिशद यांना क्रिकेट आवडत असून त्यांना पर्यटन आणि चित्रपट पहायला आवडते. एमबीए झाल्यानंतर त्यांनी दोन वर्षे बेन एण्ड कंपनीत आणि अमेरिकेतील जीई कॅपिटल कंपनीत चार वर्षे काम केले. त्यांनी साल 2007 मध्ये वडीलांच्या कंपनीत बिझनेस मॅनेजर म्हणून काम करायला सुरुवात केली.
350,000 पब्लिक स्कूल
वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने रिशद यांना यंग लिडर म्हणून गौरविले आहे. विप्रो – जीई जॉईंट व्हेंचर आणि विप्रो एन्टरप्राईझेस अशा दोन्ही संचालक मंडळात ते आहेत. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी अझिम प्रेमजी फाऊंडेशन या ना नफा ना तोटा संस्थे मार्फत सात राज्यात 350,000 पब्लिक स्कूल चालविण्यात येतात.
रिशद प्रेमजी यांचा पगार
रिशद प्रेमजी यांना यावर्षी 7.9 कोटी पगार मिळाला. तर गेल्यावर्षी त्यांना 15.1 कोटी पगार देण्यात आला. गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यांनी 7.2 कोटी कमी वेतन घेतले. त्यांना मिळालेल्या इतर उत्पन्नात रु. 12 लाख, दीर्घकालीन पगाराच्या भत्त्यांमध्ये रु. 61 लाख आणि कमाई आणि भत्त्यांमध्ये रु. 7.1 कोटींचा समावेश आहे, असे कंपनीच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. फोर्ब्सच्या मते विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांची तब्बल 9.2 अब्ज डॉलर्स ( 76,000 कोटी रु.) संपत्ती आहे.