Rocket Share | 1 मिनिटात 200 कोटींची कमाई! या कंपनीचा शेअरची ‘रॉकेट’गिरी

Rocket Share | इस्त्राईल-हमास युद्धाचे पडसाद जगभरातल्या शेअर बाजारावर दिसून आले आहेत. पण या शेअरने तेजीचे सत्र कायम ठेवले आहे. या शेअरने आज तर कमाल केली आहे. या मल्टिबॅगर स्टॉकने 1 मिनिटात 200 कोटींचा गल्ला जमावला आहे. व्यापारी सत्रात कंपनीचा शेअरने उच्चांक गाठला आहे.

Rocket Share | 1 मिनिटात 200 कोटींची कमाई! या कंपनीचा शेअरची 'रॉकेट'गिरी
Follow us
| Updated on: Oct 11, 2023 | 2:58 PM

नवी दिल्ली | 11 ऑक्टोबर 2023 : जगात सध्या रशिया-युक्रेन आणि आता इस्त्राईल-हमास (Israel-Hamas War) अशी दोन युद्ध सुरु आहेत. त्याचे पडसाद जगभर दिसत आहे. अनेक देशांना महागाईचा सामना करावा लागत आहे. तर शेअर बाजारात चढउताराचे सत्र दिसून येत आहे. अशी परिस्थितीत काही कंपन्यांचे शेअर जोरदार वधारले आहेत. अशाच एका कंपनीने बाजारात कमाल दाखवली आहे. ही कंपनी चंद्रयान 3 या महत्वकांक्षी मोहिमेशी निगडीत आहे. आकड्यांवर नजर टाकली तर एकाच महिन्यात या कंपनीचा शेअर 40 टक्क्यांनी वधारला आहे. कंपनीचा शेअर (Multibagger Share) वधारल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. तर अनेक जण हा स्टॉक खरेदीसाठी योग्य वेळेची वाट पाहत आहेत.

पाच दिवसांत कमाल

गेल्या पाच दिवसांच्या व्यापारी सत्राचा हिशोब मांडला तर कंपनीचा शेअर 16 टक्क्यांहून अधिकने उसळला आहे. आज तर या शेअरने कमालच केली आहे. एकाच मिनिटात या शेअरने 8 टक्क्यांहून अधिकची उसळी घेतली आहे. कंपनीला 200 कोटींपेक्षा अधिकचा फायदा झाला आहे. या शेअरची गगन भरारी सर्वांनाच थक्क करणारी आहे.

हे सुद्धा वाचा

अशी आहे कामगिरी

अवंटेल कंपनी लिमिटेड ही आयटी सोल्यूशन्स आणि स्पेस टेक कंपनी आहे. ती चंद्रयान-3 आणि आदित्य एल-1 मध्ये सहभागी आहे. दुपारी 1:40 वाजता या कंपनीचा शेअर 15 रुपयांनी उसळला. तो तेजीसह 332 रुपयांच्या जवळपास आहे. तर त्याने 343.30 रुपयांचा विक्रमी उच्चांक नोंदवला आहे. एक दिवसापूर्वी हा शेअर 317 रुपयांवर बंद झाला होता.

एका मिनिटात 200 कोटींहून अधिकची कमाई

या तेजीमुळे कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ झाली. कंपनीचे बाजार भांडवल एक दिवसापूर्वी ले 2580 कोटी रुपये होते. तर आज बाजार सुरु होताच कंपनीचे भांडवल 2794 कोटी रुपयांवर पोहचले. मार्केट कॅप एका मिनिटात 214 कोटी रुपयांचा फायदा झाला.

गेल्या 22 वर्षात दिला रिटर्न

  1. एवेंटल लिमिटेडचा शेअर गेल्या पाच व्यापारी सत्रात 15 टक्क्यांनी वधारला
  2. गेल्या एका महिन्यात गुंतवणूकदारांना कंपनीने 41 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिला आहे
  3. 6 महिन्यात कंपनीचा शेअर 90 रुपयांहून 343 रुपयांवर पोहचला आहे
  4. यावर्षाच्या सुरुवातीला हा शेअर 77 रुपयांना होता. सध्या तो 343 रुपयांवर व्यापार करत आहे
  5. पाच वर्षांपूर्वी हा शेअर 11 रुपयांचा होता. गुंतवणूकदारांना आतापर्यंत 3000 टक्के रिटर्न मिळाला
  6. फेब्रुवारी 2001 मध्ये हा शेअर एक रुपयांच्या पण आत होता, या 22 वर्षात त्याने 35600 टक्के रिटर्न दिला

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.