शेअर बाजारातील निराशेला ‘टाटा’; छप्परफाड परताव्यासाठी Trent चा शेअर तुमच्या पोर्टफोलिओत आहे ना? तयार रहा 1430 रुपयांच्या टार्गेटसाठी

रॉकेटच्या स्पीडने भूर्रकन जाणा-या टाटाच्या या स्टॉकने शेअर बाजाराच्या हिंदोळ्यातही गुंतवणुकदारांच्या चेह-यावर चमक आणली आहे. टाटा ग्रुपच्या Trent Ltd या कंपनीच्या शेअरने कमाल केली आहे. हा शेअर 1430 रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आताच या शेअरकडे लक्ष द्या.

शेअर बाजारातील निराशेला 'टाटा';  छप्परफाड परताव्यासाठी Trent चा शेअर तुमच्या पोर्टफोलिओत आहे ना? तयार रहा 1430 रुपयांच्या टार्गेटसाठी
छप्पफाड कमाईची अशी संधी पुन्हा नाहीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 4:56 PM

शेअर बाजारात (Share Market) काही शेअर धुमकेतू सारखे असतात तर काही त्यांचे अढळस्थान निर्माण करतात. बाजारात अढळस्थान निर्माण केलेला ग्रुप म्हणजे टाटा (Tata Group). या टाटामधील आणखी एका कंपनीने बाजारात चमकदार कामगिरी केली आहे. इतर अनेक कंपन्या गुंतवणुकदारांना चांगला परतावा देत असताना आता या गोटात ट्रेंट लिमिटेडचा (Trent Ltd) समावेश झालेला आहे. उत्तम कामगिरीच्या जोरावर हा स्टॉक 52 आठवडयांचा रेकॉर्ड तोडल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास बाजारातील तज्ज्ञांना वाटत आहे. हा शेअर लवकरच रॉकेटच्या गतीने गुंतवणुकदारांना छप्परफाड परतावा देईल. हा शेअर 1430 रुपयांचे टार्गेट लिलाया पार करेल असा विश्वास बाजारातील दिग्गाजांना वाटत आहे. टाटा ग्रुपचा विश्वास या शेअरभोवती कायम आहे. हा शेअर ब्रोकरेज फर्मचाही(Brokerage Firm) गळ्यातील ताईत बनला आहे. कोविडनंतर महागाईचा सामना करणा-या बाजाराला आणि गुंतवणुकदारांना हा शेअर म्हणजे लॉटरी आहे.

कंपनीच्या महसूलात विक्रमी वाढ

बाजारातील तज्ज्ञांनी या कंपनीच्या पोर्टफोलिओचा अभ्यास करुन काही निरीक्षणे नोंदवली आहे. त्यानुसार हा शेअर उत्तम कामगिरी करत आहे. भविष्यातही घौडदौड कायम असेल. कंपनीची व्यावसायिक उलाढाल ही उत्तम असून कंपनीचा आवाका वाढत आहे. 2022 च्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत कंपनीने 53 टक्क्यांचा विक्रमी वाढ केली आहे. या क्षेत्रातील कंपनीच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना अद्याप अशी कामगिरी बजावता आलेली नाही. कोरोनानंतर बाजारात टप्प्याटप्प्याने सुधारणा होत आहे. अर्थव्यवस्था हळहळू रुळावर येत आहे. ग्राहकाची खरेदी क्षमताही वाढत आहे. त्यामुळे येत्या काही काळात हा शेअर छप्परफाड परतावा देण्याची शक्यता आहे. अॅक्सिस सिक्योरिटीज या ब्रोकरेज फर्मनुसार, हा शेअर येत्या काही तिमाहीत ही जोरदार कामगिरी बजावणार आहे.

हे सुद्धा वाचा

कंपनीची योजना काय

ट्रेंट ही कंपनी वेस्टसाईड, ज्युडिओ, स्टार, जारा (Westside, Judio, Star, Zara )अशा ब्रँडचे एकत्रित संचालन करते. कंपनी 2023 आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत मागणीआधारीत पुरवठयात जोरदार कामगिरी करेल आणि त्याचा गुंतवणुकदारांन नक्कीच फायदा होईल. कंपनीने यंदाच्या उन्हाळ्यात उत्तम व्यावसायिक धोरण राबविले. याशिवाय कंपनी भविष्यातील वाढत्या मागणीचा व्यावसायिक लाभ उठवण्यासाठी प्रयत्नरत असून कंपनी आर्थिक वर्ष 23-24 मध्ये नवीन 135 स्टोअर उघडण्याची तयारी करत आहे. त्याआधारे कंपनी नफ्याचा रोडमॅप तयार करत आहे.

काय आहे टारगेट प्राईस

मोतीलाल ओसवाल या ब्रोकरेज फर्मनुसार, ट्रेंट कंपनीचे प्रदर्शन सर्वोत्तम आहे. इतर कंपन्यांपेक्षा ही कंपनी अग्रेसर आहे. या कंपनी येत्या 2 ते 3 वर्षात उत्तुंग भरारी घेईल. या कंपनीचे टारगेट प्राईस 1,430 रुपये राहिल. मागील बंदपेक्षा हा शेअर 28 टक्क्यांनी रॉकेट उडी घेईल. आयसीआयसीआय डायरेक्टने या स्टॉकचे निर्धारीत लक्ष किंमत 1,275 रुपये ठेवली आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.