Rupees : रुपयाची मजबूत चाल, चार वर्षात पहिल्यांदा डॉलरविरोधात थोपाटले दंड..
Rupees : डॉलरविरोधात गंटागळ्या खाणाऱ्या रुपयाने अखेर पट्टीची खेळी खेळली..
नवी दिल्ली : अमेरिकेतील (America) महागाईचा दर (Inflation Rate) अंदाजापेक्षा कमी राहिल्याने बाजाराला हायसे वाटले आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. या घडामोडीमुळे रुपयाला बळ मिळाले. डॉलरच्या (Dollar) तुलनेत रुपयाने (Rupees) एकाच दिवशी जोरदार मुसंडी मारली. इतर सर्व चलनाला(Currency) मागे सारत रुपयाने मजबूत कामगिरी बजावली.
रुपयाने एकाच दिवसात, गेल्या 4 वर्षांतील स्वतःचेच रेकॉर्ड फिरविले. आतापर्यंत घसरणीच्या दिशेने जात असलेला रुपया आज मात्र सरसर वर आला. डॉलरच्या तुलनेत रुपयात 62 पैशांची वृद्धी दिसून आली. त्यामुळे अनेक दिवसांपासूनचा दबाव रुपयाने झुगारल्याचे चित्र आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपया 80.78 च्या स्तरावर बंद झाला. गेल्या सात महिन्यांपासून रुपयाची कामगिरी अत्यंत दयनीय होती. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या धोरणावर सातत्याने यामुळे टीक होत होती. पण आज रुपयाच्या प्रदर्शनामुळे टीकाकार ही आर्श्चयचकित झाले.
परदेशी गंगाजळी वाढत असल्याने त्याचा परिणाम बाजारावर दिसून आला. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाने मजबूत कामगिरी बजावली. गेल्या व्यापारी सत्रात रुपया 81.40 प्रति डॉलर वर बंद झाला होता. आज तो 80.78 प्रति डॉलरवर बंद झाला.
बाजारातील सूत्रांनुसार भारतीय शेअर बाजारात सध्या तेजीचे वारे आहे. तसेच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा पुन्हा भारतीय बाजारकडे ओढा वाढला आहे. त्यामुळे रुपयाला एकाप्रकारे बळ मिळाले आहे. त्यामुळे रुपयाने आज जोरदार कामगिरी बजावली.
कच्चा तेलाच्या किंमतींनी रुपयाच्या चालीवर परिणाम केला. त्यामुळे रुपयाला आणखी मोठी उडी घेता आली नाही. क्रूड ऑइलच्या किंमतीत 2.56 टक्क्यांची वाढ होऊन त्या 96.07 डॉलर प्रति बॅरलवर बंद झाल्या.