काय सांगताय भाऊ, Credit Card अन् कोणतेही वार्षिक आणि प्रोसेस शुल्क नाही; तर जाणून घ्या Card ची इतर वैशिष्ट्ये

या कार्डसाठी व्याजमुक्त कालावधी 37-45 दिवसांचा आहे. मात्र, वेळेवर पेमेंट न केल्यास, त्यावरही सामान्य क्रेडिट कार्डप्रमाणे व्याज आकारले जाते. व्याजमुक्त कालावधीनंतर, कंपनी वार्षिक 30 टक्के म्हणजेच मासिक 2.5 टक्के व्याजदर आकारते.

काय सांगताय भाऊ, Credit Card अन् कोणतेही वार्षिक आणि प्रोसेस शुल्क नाही; तर जाणून घ्या Card ची इतर वैशिष्ट्ये
फिनटेक कंपनी रुपीकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 7:46 AM

नवी दिल्ली : आज सर्वसामान्यांच्या खिशात एक तरी बँकेचे डेबिट कार्ड (Debit Card) हे असतंच. ज्यावर आपण आपली आर्थिक कामं पार पाडतं असतो. मात्र आज अनेक जन असे आहेत. ज्यांच्याकडे बँकांचे डेबिट कार्ड असतातच त्याचबोरबर ते क्रेडिट कार्ड्स (Credit Card) हा वापर करतात. मात्र अनेक Credit Card घेताना वार्षिक आणि प्रोसेस शुल्क हे भरावे लागतं. त्यामुळे अनेकांना असे Credit Card ही डोकेदुखी ठरली आहे. तसेच अलीकडेच, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) क्रेडिट कार्ड्सबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तरीही रिझर्व्ह बँकेने फिनटेक कंपन्यांना क्रेडिट कार्ड जारी करण्याची परवानगी दिलेली नाही. तथापि, बँकांशी टाय-अप करून क्रेडिट कार्ड सुरू केले जाऊ शकतात. त्याच धर्तीवर फिनटेक कंपनी रुपीकने (rupeek fintech company) क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. जे एक सुरक्षित कार्ड आहे. सहसा सर्व क्रेडिट कार्ड असुरक्षित असतात ज्यामुळे ते खूप जास्त व्याजदर आकारतात. या कार्डचे नाव रुपीक प्राइम असे ठेवण्यात आले आहे. याला गोल्ड कार्ड देखील म्हटले जाऊ शकते. कारण जेव्हा तुम्ही कंपनीकडे सोने गहाण ठेवता तेव्हाच ते जारी केले जाते.

रुपीकचे क्रेडिट कार्ड हे सुरक्षित कार्ड आहे. यामध्ये ग्राहकाला दागिने आणि सोने गहाण ठेवावे लागते. क्रेडिट कार्ड मर्यादा तुमच्या होल्डिंगच्या मूल्याच्या 75% पर्यंत असेल. क्रेडिट कार्ड जारी करण्यासाठी कंपनीने RBL बँकेशी करार केला आहे. हे कार्ड देशांतर्गत RuPay नेटवर्क वापरते. या कार्डची कमाल मर्यादा 50 लाख रुपये देण्यात आली आहे.

सुविधा मर्यादित शहरांमध्ये

सध्या या कार्डची सुविधा भारतातील मर्यादित शहरांमध्ये उपलब्ध आहे. हे हैदराबाद, मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकाता, जयपूर, राजकोट, वडोदरा, चंदीगड, अहमदाबाद, सुरत, बंगळुरू या शहरांमध्ये उपलब्ध आहे. कार्ड ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने वापरता येते. या कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधाही आहे. कार्ड भौतिक आणि आभासी दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे.

हे सुद्धा वाचा

कोणतेही अर्ज शुल्क आणि वार्षिक शुल्क नाही

कंपनीचे उपाध्यक्ष दीपक सिंघल म्हणाले की, जे लोक नोकरी करतात किंवा निवृत्त झाले आहेत आणि त्यांच्याकडे सोने आहे, त्यांना हे कार्ड आवडते. हे कार्ड आपत्कालीन निधी म्हणून वापरले जाते. हे क्रेडिट कार्डप्रमाणेच काम करते. या कार्डसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. याशिवाय कोणत्याही प्रकारचे वार्षिक शुल्क आकारले जात नाही.

संपूर्ण मर्यादा रोख स्वरूपात काढता येते

या कार्डसाठी व्याजमुक्त कालावधी 37-45 दिवसांचा आहे. मात्र, वेळेवर पेमेंट न केल्यास, त्यावरही सामान्य क्रेडिट कार्डप्रमाणे व्याज आकारले जाते. व्याजमुक्त कालावधीनंतर, कंपनी वार्षिक 30 टक्के म्हणजेच मासिक 2.5 टक्के व्याजदर आकारते. विशेष बाब म्हणजे क्रेडिट कार्डधारक संपूर्ण मर्यादा रोख स्वरूपातही काढू शकतो. यासाठी 1% प्रक्रिया शुल्क आहे. इतर क्रेडिट कार्डसाठी, हे शुल्क खूप जास्त आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.