SHARE MARKET TODAY: गुंतवणुकदारांचा सावधगिरीचा पवित्रा, शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स 58 हजारांच्या खाली

गुंतवणुकदारांनी सावधगिरीचा पवित्रा धारण केल्याचं चित्र दिसून आलं. आज (बुधवारी) बाजार सुरू झाल्यानंतर तेजीचं चित्र होतं. मात्र, दिवसभराच्या कामगिरीत सातत्य न राहिल्याने शेअर बाजार दिवसअखेर गडगडला.

SHARE MARKET TODAY: गुंतवणुकदारांचा सावधगिरीचा पवित्रा, शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स 58 हजारांच्या खाली
शेअर बाजारात नेमकं काय घडतंय?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 7:19 PM

नवी दिल्लीयूक्रेन-रशिया वादाचे पडसाद भारतीय शेअर बाजारावर (Share market) उमटले. गुंतवणुकदारांनी सावधगिरीचा पवित्रा धारण केल्याचं चित्र दिसून आलं. आज (बुधवारी) बाजार सुरू झाल्यानंतर तेजीचं चित्र होतं. मात्र, दिवसभराच्या कामगिरीत सातत्य न राहिल्याने शेअर बाजार दिवसअखेर गडगडला. सेन्सेक्स 145.37 अंकांच्या घसरणीसह (0.25%) 57,996.98 वर पोहोचला आणि निफ्टी 30.25 अंकांच्या घसरणीसह (0.17%) 17332.2 वर पोहोचला. काल (मंगळवारी) मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजाराने (Share market updates) पुन्हा उसळी घेतली होती. सेन्सेक्सने 58 हजारांचा टप्पा पुन्हा पार केला होता. रशिया-यूक्रेन (Russia-Ukraine crisis) वाद निवळत आहे. रशियाने युक्रेनच्या सीमारेषेवरुन पुन्हा सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. ‘नाटो’च्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती निवळत असल्याने गुंतवणुकदारांत समाधानाचं वातावरण दिसलं. त्यामुळे पुन्हा शेअर बाजार स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न दिसून आला.

आजचे टॉप गेनर्स

1.डिव्हिज लॅब (3.22) 2.अदानी पोर्टस (2.80) 3.ओएनजीसी (2.68) 4.आयओसी (2.32) 5.एचडीएफसी लाईफ (2.22)

आजचे घसरणीचे शेअर्स

1.पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन (-3.51) 2.एनटीपीसी (-1.59) 3.आयसीआयसीआय बँक (-1.55) 4.एसबीआय (-1.54) 5.अल्ट्राटेक सिमेंट (-1.53)

कच्चा तेलाच्या भावात घसरण-

युक्रेन-रशिया वादाचे पडसाद भारतासह आंतरराष्ट्रीय अर्थजगतावर उमटले. मात्र, रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेल्या निवेदनानंतर वातावरणातील तणाव निवळला. पश्चिमी देशांसोबत चर्चेची दारं खुली आहेत. त्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण नोंदविली गेली. सध्या कच्च्या तेलात 2.55 टक्क्यांची घसरण दिसून आली आणि 94.21 डॉलर प्रति बॅरल वर तेलाचे व्यापार सुरू आहेत.

ओएनजीसी गेनर्स:

सार्वजनिक क्षेत्रातील (Public Sector) आघाडीची कंपनी ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या (ONGC) कामगिरीत वाढ दिसून आली आहे. ओएनजीसीनं तिमाही अहवाल प्रकाशित केला आहे. उत्पादनातील घसरणीमुळे तेल (Oil) आणि गॅसच्या (Gas) वाढत्या किंमती ओएनजीसीच्या पथ्यावर पडल्याचं अहवालातून दिसून आलं आहे. तिसऱ्या तिमाहित ओएनजीसीच्या निव्वळ नफ्यात तब्बल सात टक्क्यांची वाढ झाली आहे. ऑक्टोबर-डिसेंबर 2021 तिमाहित निव्वळ नफा 8,764 कोटी रुपये झाला आहे.

मुलाच्या नावे मुदत ठेव केल्यास मिळणा-या व्याजावर कोणाला भरावा लागेल कर ? जाणून घ्या नियम

LIC IPO : केंद्राचा एक बाण, तीन निशाणे, एलआयसीचा आयपीओ दृष्टीपथात, विमाधारकांसाठी 10 टक्के शेअर राखीव

GOLD PRICE TODAY: सोन्याची 50 हजारी घौडदोड, मुंबईसह महाराष्ट्रात सोनं महागलं; आजचे भाव काय?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.