Russia Ukraine crisis : भारताच्या इंधन पुरवठ्यावर परिणाम होणार? जाणून घ्या काय म्हटले सरकारने

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण पहायला मिळत होते. अखेर युद्धाला सुरुवात झाली आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला करताच आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती (crude oil price) झपाट्याने वाढल्या आहेत.

Russia Ukraine crisis : भारताच्या इंधन पुरवठ्यावर परिणाम होणार? जाणून घ्या काय म्हटले सरकारने
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 8:05 AM

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण पहायला मिळत होते. अखेर युद्धाला सुरुवात झाली आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला करताच आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती (crude oil price) झपाट्याने वाढल्या आहेत. कच्चा तेलाच्या किमती 103 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. कच्चे तेल महागल्याने भारतात देखील इंधनाचा भडका उडण्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र याबाबत बोलताना एका उच्चस्थरीय सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा परिणाम हा भारतावरील इंधन पुरवठ्यावर supply) होणार नाही. इंधनाचा तुटवडा जाणू नये याकडे सरकारचे पूर्ण लक्ष आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून आतंरराष्ट्रीय स्थरावर सातत्याने कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. कच्च्या तेलाच्या किमती वाढत असताना देशातील प्रमुख इंधन पुरवठा कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या किमतींमध्ये (petrol and diesel price) कोणतीही वाढ केलेली नाही. देशात गेल्या 114 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत.

…म्हणून परिणाम होणार नाही

या बाबत बोलताना अधिकाऱ्याने सांगितले की, रशिया आणि युक्रेनमध्ये कितीही दिवस युद्ध चालले तरी त्याचा परिणाम हा भारताच्या इंधन पुरवठ्यावर होणार नाही. कारण भरताला इंधनाचा पुरवठा हा पश्चिम अशिया, अफ्रिका आणि उत्तर अमेरिकेमधून होतो. या भागावर हल्ले होण्याची शक्यता नाही. त्यामुळे भराताच इंधनपुरवठा सुरळीत सुरू राहील. युद्धामुळे देशात पेट्रोल, डिझेलचा तुटवडा जाणावणार नाही. मात्र सध्या महागाई वाढत आहे. वाढत्या महागाईमुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल, डिझेलचे दर वाढू शकतात, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

2014 नंतर कच्च्या तेलाच्या दरात सर्वाधिक वाढ

गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यात आणखी भर पडली आहे. त्यामुळे आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 103.78 डॉलरवर पोहोचले आहेत. 2014 नंतरची ही सर्वाधिक भाववाढ आहे. आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले असताना देखील देशात पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर आहेत. सध्या देशात निवडणुकीचे वातावरण आहे. निवडणूक झाल्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Russia Ukraine crisis : भारताला गव्हाची निर्यात वाढवण्याची संधी; देशात पुरेशा प्रमाणात साठा

सरकारी कर्मचाऱ्यांना का नकोय ‘एनपीएस’? जाणून घ्या जुन्या पेन्शन योजनेचे फायदे

काय आहे फंड ऑफ फंड्सचा फंडा?; गुंतवणूक कशी कराल?

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.