Russia-Ukraine war : बिस्किट खरेदीपासून ते हॉटेलमधील जेवणापर्यंत सर्वच वस्तू महागणार!

रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा दहावा दिवस आहे. या युद्धाचा जगातील अनेक देशांवर परिणाम झाला आहे. यामध्ये भारताचा (India) देखील समावेश आहे. युद्धामुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट फटका तुम्हाला बसू शकतो.

Russia-Ukraine war : बिस्किट खरेदीपासून ते हॉटेलमधील जेवणापर्यंत सर्वच वस्तू महागणार!
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 5:30 AM

मुंबई : रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा दहावा दिवस आहे. या युद्धाचा जगातील अनेक देशांवर परिणाम झाला आहे. यामध्ये भारताचा (India) देखील समावेश आहे. युद्धामुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट फटका तुम्हाला बसू शकतो. हॉटेलमधील जेवण आणि बिस्किटांच्या खरेदीसाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. आता तुम्ही हा विचार करत असाल की, युद्धाचा आणि बिस्किट खरेदीचा काय संबंध? बिस्किटाच्या किमती वाढण्यामागे गहू दरवाढीचे कारण आहे. बिस्किटाची निर्मिती ही गव्हापासून होते. गव्हाचे दर वाढल्यास आपोआपच बिस्किटांच्या दरामध्ये वाढ होणार आहे. तसेच गव्हाचे दर वाढल्यामुळे हॉटेलचे जेवण देखील महाग होण्याची शक्यता आहे. गव्हाच्या किमती अचानक का वाढल्या याची कारणे प्रथम आपण जाणून घेऊयात.

भाव वाढीचे कनेक्शन

रशिया हा जगातील सर्वात मोठा गहू उत्पादक देश आहे. तर युक्रेन हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश आहे. जगभरातील गहू उत्पादक देश वर्षाकाठी तब्बल 20 कोटी टन गव्हाची निर्यात करतात. यापैकी पाच ते सहा कोटी टन गव्हाची निर्यात ही रशिया आणि युक्रेनमधून होते. याचाच अर्थ जवळपास चाळीस टक्के गहू या दोन देशांमधून निर्यात केला जातो. मात्र आता रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्यामुळे तिकडून येणारा गव्हाचा पुरवठा ठप्प झाला आहे. गव्हाचा पुरवठा ठप्प झाल्याने पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक वाढली, त्यामुळे गव्हाचे दर वाढले आहेत. गव्हाचे दर वाढल्याने आपोआपच गव्हापासून निर्माण होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे दर वाढणारच आहेत. बिस्किटाचे उत्पादन घेणाऱ्या अनेक कंपन्या या बिस्किट निर्मितीसाठी गव्हाचाच वापर करतात. त्यामुळे गहू महागल्यास बिस्कीट देखील महागणार आहेत.

बियर उद्योग संकटात

रशिया भारत आणि युक्रेन हे जगातील प्रमुख गहू उत्पादक देश आहेत. या यादीमध्ये रशियाचा प्रथम भारताचा दुसरा तर युक्रेनचा तिसरा नंबर लागतो. गव्हापासून मोठ्याप्रमाणात बियर तयार केली जाते. मात्र यंदा रशिया आणि युक्रेन युद्धाचे सावट बियर उद्योगावर असल्याचे दिसून येत आहे. युक्रेन आणि रशियामधून इतर देशांना होणारा गव्हाचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. भारतात देखील गव्हाची किंमत क्विंटल मागे 80 ते 85 रुपयांनी वाढली आहे. गव्हाची किंमत वाढल्याने बियर निर्मितीच्या खर्चात भर पडली आहे. दोन वर्ष कोरोनाचे संकट आणि यंदा युद्धाचे सावट त्यामुळे बियर उद्योग संकटात सापडला आहे.

संबंधित बातम्या

गव्हाच्या भावात वाढ, जाणून घ्या गहू दरवाढीचे रशिया कनेक्शन

रशिया -युक्रेन युद्ध वाहन उद्योगाच्या मुळावर, देशात सेमीकंडक्टरचा तुटवडा; फेब्रुवारीमध्ये वाहन विक्रीत घट

Ukraine crisis : शेअर बाजार कोसळला, कच्च्या तेलाचे दर गेल्या 8 महिन्यातील सर्वोच्च स्तरावर, सोनंही महागलं

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.