Russia Ukraine War : सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा वाढ, सोने गेल्या 14 महिन्यातील सर्वोच्च स्तरावर
गेल्या नऊ दिवसांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम अंतरराराष्ट्रीय बाजारपेठेवर होताना दिसून येत आहे. जागतिक स्थरावर सोन्याच्या दरात (Gold Rate) विक्रमी वाढ झाली आहे. दुसरीकडे भारतात देखील सोन्याचे दर 14 महिन्यातील सर्वोच्च स्तरावर पोहोचले आहेत.
मुंबई : गेल्या नऊ दिवसांपासून युक्रेन (Ukraine) आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम अंतरराराष्ट्रीय बाजारपेठेवर होताना दिसून येत आहे. जागतिक स्थरावर सोन्याच्या दरात (Gold Rate) विक्रमी वाढ झाली आहे. दुसरीकडे भारतात देखील सोन्याचे दर 14 महिन्यातील सर्वोच्च स्तरावर पोहोचले आहेत. आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात 241 रुपयांची वाढ होऊन सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 52011 रुपयांवर पोहोचले आहे. चांदीच्या दरात (Silver Price) देखील तेजी दिसत असून, आज चांदीच्या दरात 316 रुपयांची वाढ झाली आहे. शुक्रवारी चांदीचे दर 68220 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या भावामध्ये तीव्र चढ उतार पहायला मिळत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. येत्या काळात सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
गुरुवारी प्रति तोळ्यामागे हजार रुपयांची वाढ
गुरुवारी तीन मार्च रोजी देखील सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळाले होते. गुरुवारी सोने तब्बल प्रति तोळ्या मागे एक हजार रुपयांनी वाढले होते. तर चांदीच्या दरात देखील तेजी होती. आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात प्रति तोळा 241 रुपयांची वाढ झाली आहे. कमोडीटी मार्केटनुसार आज 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 52011 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीच्या खरेदीसाठी प्रति किलोला 68220 रुपये मोजावे लागत आहेत.
वाहन व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू देखील महागणार?
सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा सर्वाधिक फटका हा पुरवठा साखळीला बसला आहे. युद्धामुळे पुरवठा साखळी प्रभावित झाल्याने आयात आणि निर्यात मंदावली आहे. भारत हा वाहनांसाठी तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तुंमध्ये वापर होणाऱ्या सेमीकंडक्टरचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. यातील अनेक वस्तुंचा पुरवठा आपल्याला रशियाकडून होतो. मात्र आता युद्धाचे ढग अधिक गड होताना दिसून येत असल्याने येणाऱ्या काळात वाहने व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू महागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संबंधित बातम्या
रशिया – युक्रेन युद्धाचा भारताला फटका, विदेशी मुद्रा भंडारातून दोन अब्ज डॉलरचा अतिरिक्त खर्च!