रशिया-युक्रेन युद्धाचा खाद्यतेलाच्या आयातीला फटका; तेलाचे दर वाढणार?

युक्रेन (Ukraine) आणि रशियामधील (Russia) संघर्ष सुरूच आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम आता वस्तुंच्या पुरवठ्यावर होताना दिसून येत आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सुर्यफूल तेलाच्या (Sunflower oil) पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचा खाद्यतेलाच्या आयातीला फटका; तेलाचे दर वाढणार?
खाद्य तेल
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 8:41 AM

नवी दिल्ली : युक्रेन (Ukraine) आणि रशियामधील (Russia) संघर्ष सुरूच आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम आता वस्तुंच्या पुरवठ्यावर होताना दिसून येत आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सुर्यफूल तेलाच्या (Sunflower oil) पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सुर्यफूल तेलाची आयात मंदावल्याने तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. मात्र तेल पुरवठा कमी होऊन किमती वाढू नये यासाठी आवश्यक ते पाऊले उचलण्यात येत असल्याची माहिती केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. आता इतर देशांकडून सुर्यफूत तेलाच्या आयातीसाठी प्रयत्न केले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर उद्योग संघटना एसईए (SEA) च्या एका शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. देशात तेलाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी इतर देशातून तेलाचा पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

70 टक्के तेलाचा पुरवठा युक्रेनमधून

याबाबत बोलताना ‘एसईए’चे कार्यकारी निर्देशक बी. व्ही. मेहता यांनी म्हटले की, युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम हा सुर्यफूल तेलाच्या पुरवठ्यावर झाला आहे. युद्धामुळे तेलाच्या पुरवठ्यामध्ये अडचणी येत आहेत. भारत वर्षाकाठी जवळपास 25 लाख टन सूर्यफूलाचे तेल आयात करतो. यातील सत्तर टक्के तेल हे युक्रेनमधून तर 20 टक्के तेल रशियामधून आयात केले जाते. अर्जेंटीनाकडून भारताला दहा टक्के तेलाचा पुरवठा होतो. दर महिन्याला सरासरी आपण दोन लाख टन तेल आयात करतो. मात्र सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्याने तेलाच्या आयातीमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. तेलाचा पुरवठा कमी झाला आहे. तेलाचा पुरवठा कमी झाल्यास किमती वाढू शकतात. दर नियंत्रणात ठेवण्यासाठी इतर देशांकडून तेल आयात करण्याची आवश्यकता आहे.

पुढच्या 15 दिवसांमध्ये स्थिती सुधारण्याचा अंदाज

दरम्यान याबाबत बोलताना अदानी विल्मरचे सीईओ एमडी अंग्शु मलिक यांनी सांगितले की, सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सुर्यफुल तेलाच्या आयातीवर परिणाम झाला आहे. मात्र या स्थितीमध्ये पुढील 15 दिवसांमध्ये सुधारना होऊ शकते. त्यामुळे याचा फारसा फरक हा तेलाच्या किरकोळ विक्रीवर होणार नाही. सरकारकडून सुर्यफूल तेलाच्या आयातीचे प्रयत्न सुरू आहेत.

संबंधित बातम्या

डाळीच्या ठोक भावात घसरण सुरूच, गेल्या वर्षभरात उडीद डाळीच्या दरात 5 टक्क्यांची घट

IPO मध्ये गुंतवणूक करायचीये? तर मग त्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात घ्या

Equity Mutual Funds: सर्वोत्तम रिटर्नसाठी हवं प्रभावी प्लॅनिंग, मार्केट घसरणीवेळी काय करावं; जाणून घ्या

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...