खासगी क्षेत्रातील बँका बचत खात्यावर 6 टक्क्यांपेक्षा अधिकचे व्याज देतात; जाणून घ्या कुठे होईल फायदा

सध्या बचत खात्यातील व्याजदर कमी झाला आहे. तरीही काही बँका बचत खात्यावर 6 टक्क्यांपेक्षा अधिकचे व्याज देत आहेत. जाणून घ्या कोणत्या बँकेत तुम्हाला अधिकचा फायदा

खासगी क्षेत्रातील बँका बचत खात्यावर 6 टक्क्यांपेक्षा अधिकचे व्याज देतात; जाणून घ्या कुठे होईल फायदा
MoneyImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 11:33 AM

तुमच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलियोमध्ये एक गुंतवणूक योजना ( Investment Plan)असायला हवी की जी तुम्हाला, आर्थिक संकटात मदतीचा हात पुढे करु शकेल. तसेच तुमच्याकडे खेळत्या भांडवलासह उत्तम परतावा देण्यातही ती सहायक ठरेल. व्यापारी, पगारदार अथवा गैरपगारदार यांनी बँकेत बचत खाते उघडायला हवे. बचत खात्यातील (Savings Account) रक्कमेवरील व्याजदर हे प्रत्येक दिवसावर आधारीत असतात. तर त्याचा परतावा दर तीन महिन्याला करण्यात येतो. 30 जून, 30 सप्टेंबर, 31 डिसेंबर आणि 31 मार्च या दिवशी तुमच्या खात्यातील रक्कमेवर बँक तुम्हाला व्याज देते. सध्या अनेक बँकांची बचत खात्यावरील व्याजदर (Interest Rate) ग्राहकांसाठी चिंतेचा विषय झाला आहे, कारण अनेक बँकांनी व्याजदर कमालीचा कमी केला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या हाती व्याजापोटी येणारी रक्कम अत्यंत तोकडी असते. तरीही काही बँका ग्राहकांना चांगला व्याजदर देत आहेत. त्यामुळे त्यांना परतावा ही चांगला मिळत आहे.

तुमच्या उद्दिष्टांनुसार बँकेत वेगवेगळ्या प्रकारची बचत खाती आहेत. परंतू बचत खाता उघडण्याचा मुख्य आणि प्राथमिक उद्देश हा अल्पकालीन आर्थिक संकटांचा सामना करणे हाच आहे. ठेव विमा आणि ऋण हमी निगमकडून (DICGC) 5 लाख रुपयांपर्यंतच्या बचत खात्यांना संरक्षण देण्यात येते. बचत खात्यात गंगाजळी चांगली असली तर दुहेरी फायदा होतो. एकतर बचतीवर व्याज मिळते आणि एक मोठी खेळती रक्कम ग्राहकाच्या हाती असते. जी गरजेच्यावेळी त्याच्या उपयोगी पडते.

कोणत्या बँका सर्वाधिक व्याज देतात?

व्याजदरांच्या बाबतीत विचार केला जातो, तेव्हा अनेक बँका कमी व्याज देत असल्याचे दिसते. अशावेळी खासगी क्षेत्रातील या तीन बँकांचा ग्राहकांपुढे चांगला पर्याय आहे. या बँका ग्राहकांना 6 टक्क्यांहून अधिकचा परतावा देत आहेत. लक्षात ठेवा, या बँकांना शीर्षस्थानी ठेवण्यामागे त्यांचे भागभांडवल किती आहे, याचा किंचितही विचार करण्यात आलेला नाही, केवळ त्या चांगला परतावा देत असल्याने त्यांची माहिती देत आहोत.

  1. डीसीबी बँक डीसीबी खासगी क्षेत्रातील एकमात्र अशी बँक आहे की जी यावेळी बचत खात्यावर सर्वाधिक व्याज देत आहे. 50 लाख ते 2 कोटी रुपयांच्या खात्यातील बचतीवर ही बँक 6.75 टक्के व्याज देत आहे. बँकेने 7 फेब्रुवारी 2022 पर्यंत, निवासी, एनआरई आणि एनआरओ बचत खात्यावर सर्वात जास्त व्याज दिले आहे. बँक खात्यात 1 लाख रुपयांच्या बचतीवर 2.50 टक्के, 1 ते 2 लाख रुपयांच्या बचतीवर 4.50 टक्के, 2 ते 10 लाख रुपयांच्या बचतीवर 5 टक्के , 10 लाख ते 25 लाखांच्या बचतीवर 6.25 टक्के, 25 लाख ते 50 लाख रुपयांच्या बचतीवर 6.50 टक्के व्याज ही बँक देत आहे.
  2. आरबीएल बँक आरबीएल बँक बचत खात्यावरील व्याज देण्यात दुस-या क्रमांकावर आहे. आरबीएल बँक 10 लाख रुपयांहून अधिक अथवा 5 कोटी रुपयांहून कमी बचत रक्कमेवर 6.25 टक्के व्याज देत आहे. बँक 1 लाख रुपयांच्या बचतीवर 4.25 टक्के, 1 लाख ते 10 लाख रुपयांच्या बचतीवर 5.50 टक्के तर 10 लाख ते 3 कोटींच्या बचत रक्कमेवर 6.25 टक्के व्याज देत आहे.
  3. बंधन बँक बंधन बँक बचतीवरील व्याजदराबाबत तिस-या क्रमांकावर आहे. बँक 10 लाख ते 2 कोटी रुपयांच्या नियमीत बचतीवर 6 टक्के व्याज देते. बँक 1 लाख रुपयांच्या बचतीवर 3 टक्के व्याज, एक लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतच्या नियमीत बचतीवर 5 टक्के, 10 लाख ते 2 कोटी रुपयांच्या बचतीवर 6 टक्के, 2 कोटी ते 10 कोटींच्या नियमीत बचतीवर 5 टक्के व्याज देत आहे.

इतर बातम्या: 

Mumbai Water : यंदा मुंबईकरांना पाणी कपातीचे टेन्शन नाही, पुढच्या 5 महिन्यांचा पाणीसाठा शिल्लक!

LPG Price Hike : दूध महागलं, पेट्रोल डिझेलनंतर आता एलपीजी सिलेंडरही महागले, चेक करा आजचे रेट

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.