SBI च्या कोट्यावधी ग्राहकांसाठी Good News! गरज पडली तर जास्तीचे पैसे देणार बँक, वाचा सविस्तर

बँकेची ही सुविधा ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणून ओळखली जाते. ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया आणि आपण त्याचा लाभ घेऊ शकता.

SBI च्या कोट्यावधी ग्राहकांसाठी Good News! गरज पडली तर जास्तीचे पैसे देणार बँक, वाचा सविस्तर
एसबीआय प्लॅटिनम डिपॉझिट स्कीम काय आहे: एसबीआय प्लॅटिनम डिपॉझिट स्कीम अंतर्गत लोकांना 75 दिवस, 75 आठवडे आणि 75 महिन्यांच्या एफडीसाठी 0.15 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त व्याज दिले जाईल. या योजनेंतर्गत हा लाभ 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर उपलब्ध होईल.
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 11:43 AM

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांना नेहमीच एक खास सुविधा देत असते. आताही बँकेने ग्राहकांसाठी धमाकेदार सुविधा आणली आहे. बँकेची ही सुविधा ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणून ओळखली जाते. ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया आणि आपण त्याचा लाभ घेऊ शकता. (sbi bank giving overdraft facility now customers can withdraw more than you have deposit in bank account)

खरंतर, कधीकधी अचानक पैशांची गरज भासते आणि अशा वेळी पैसे येण्याचे सगळे मार्ग बंद असले तर मोठं आर्थिक संकट ओढावतं. पण या परिस्थितीवर एक बँक ग्राहकांच्या कायम सोबत आहे. कोणतीही मदत न मिळाल्यास, अनेकदा लोक क्रेडिट कार्डची मदत घेतात किंवा वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करतात. पण वैयक्तिक कर्जात व्याज दर खूप जास्त आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एसबीआय ओव्हरड्राफ्टच्या खास वैशिष्ट्याबद्दल सांगणार आहोत.

ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय ?

महत्त्वाचं म्हणजे देशातल्या सगळ्या बँका ओव्हरड्राफ्ट सुविधा देतात. सरकारी आणि खासगी बँकादेखील ओव्हरड्राफ्ट सुविधा देतात. अनेक बँका चालू खातं, पगार खातं आणि मुदत ठेव (एफडी) वर ही सुविधा देतात. काही बँका समभाग, बाँड आणि विमा पॉलिसी सारख्या मालमत्तांच्या बदल्यात ओव्हरड्राफ्ट सुविधा देतात. या सुविधेअंतर्गत तुम्ही बँकेकडून तुम्हाला आवश्यक ते पैसे घेऊ शकता आणि नंतर ती रक्कम कर्जाच्या स्वरुपात परत करू शकता.

SBI मध्ये कोणाला मिळते ओव्हरड्राफ्ट सुविधा?

SBI च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, पगाराच्या खात्यात नियमित पगार जमा होत असेल तर ग्राहक ओव्हरड्राफ्ट सुविधा वापरू शकतो. ओव्हरड्राफ्ट सर्व्हिसेसचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बँकेत अर्ज करावा लागेल. बँकेच्या अ‍ॅपमध्ये ही सुविधा दिली जाते. जर बँकेत एफडी नसेल तर त्यासाठी आधी तुम्हाला बँकेत असलेल्या कोणत्याही मालमत्तेची तारण ठेवावी लागेल. यानंतर, अटी पूर्ण करताच बँका तुम्हाला ओव्हरड्राफ्ट सुविधा देते.

ओव्हरड्राफ्टबाबत महत्त्वाच्या गोष्टी

– घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी कालावधी दिला जाईल. वेळेत कर्ज नाही परत केले तर त्यासाठी दंडही आकारला जाईल.

– EMI देण्याच्याही काही मर्यादा नाही आहेत. तुम्ही कधीही संपूर्ण रक्कम बँकेला परत करू शकता.

– जॉईंट अकाऊंट असणारेही या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

ओव्हरड्राफ्टमध्ये किती पैसे घेऊ शकते?

ओव्हरड्राफ्ट अंतर्गत तुम्ही किती पैसे घेऊ शकता याबाबत बँक निर्णय घेईल. हे तुमच्या उत्त्पन्नावरही अवलंबून आहे. वेतन आणि एफडीच्या बाबतीत बँकेच्या मर्यादा अधिक आहेत. सध्या अनेक बँका त्यांच्या चांगल्या ग्राहकांना ओव्हरड्राफ्टची सुविधा आधीच देते. त्यामुळे कर्ज घेणं सोपं जातं.

सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर बँकेत तुमच्याकडे 2 लाख रुपयांची एफडी असेल तर बँक ओव्हरड्राफ्टसाठी 1.60 लाख रुपये 80 %) मर्यादा निश्चित करू शकते. शेअर आणि डिबेंचर्सच्या बाबतीत ही मर्यादा 40 ते 70 टक्के असू शकते. (sbi bank giving overdraft facility now customers can withdraw more than you have deposit in bank account)

संबंधित बातम्या – 

SBI, HDFC सह ‘या’ बँकांची स्पेशल FD स्‍कीम, 31 मार्चपर्यंत गुंतवणुकीची सुवर्णसंधी

कमी पैशांमध्ये जास्त परतावा देणाऱ्या LIC च्या धमाकेदार योजना; फायदे वाचून करा गुंतवणूक

फक्त 1 रुपये खर्च करून मिळणार 2 लाखांचा फायदा, Bank of Baroda ची धमाकेदार योजना

(sbi bank giving overdraft facility now customers can withdraw more than you have deposit in bank account)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.