या दोन ऑनलाईन सेवांसाठी एसबीआय आकारते इंटरनेट बँकिंग शुल्क, प्रति ट्रान्झॅक्शन 50 रुपये चार्ज
एसबीआयच्या अशा दोन ऑनलाईन सेवा आहेत ज्या विनामूल्य नाही तर चार्जेबल आहेत. (SBI charges internet banking fees for these two online services)
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआय आपल्या ग्राहकांकडून वेगवेगळ्या सेवांसाठी वेगवेगळे शुल्क आकारते. यात एटीएममधून पैसे काढणे, चेक बुक काढणे, बँक शाखेतून पैसे काढणे, डेबिट कार्ड इश्यू यासह विविध सेवांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना त्यांचे बहुतेक काम ऑनलाईन करण्याचे आवाहन केले जात आहे कारण ऑनलाईन सेवा विनामूल्य आहेत. परंतु एसबीआयच्या अशा दोन ऑनलाईन सेवा आहेत ज्या विनामूल्य नाही तर चार्जेबल आहेत. (SBI charges internet banking fees for these two online services)
आपण डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन व्यवहार केले तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क भरावे लागत नाही. परंतु रेल्वे व विमान तिकिटे बुक केल्यास इंटरनेट बँकिंग शुल्क द्यावे लागेल. एसबीआयच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, जर तुम्ही एसबीआय कार्डद्वारे आयआरसीटीसी वेबसाईटवर पैसे भरले तर 10 रुपये बँकिंग चार्ज लागेल. ऑनलाईन विमान तिकिट बुक केल्यास 50 रुपये शुल्क वजा केले जाईल. दोन्ही परिस्थितीमध्ये सेवा कर स्वतंत्रपणे वेगळा आकारला जाईल.
NEFT ट्रान्झेक्शन शुल्क
आपण आयएमपीएस, आरटीजीएस, एनईएफटी व्यवहार ऑनलाईन केल्यास त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तथापि, यासाठी बँक शाखेत शुल्क लागू आहे. जर तुम्ही बँक शाखेत जात असाल आणि 10 हजार रुपयांचे एनईएफटी केले तर ट्रान्झेक्शन शुल्क 2 रुपये असेल, 10 हजार ते 1 लाख रुपयांसाठी ट्रान्झेक्शन शुल्क 4 रुपये, 1-2 लाखांसाठी हा शुल्क 12 रुपये आणि 2 लाखाहून अधिक व्यवहारासाठी 20 रुपये शुल्क असेल. जीएसटी स्वतंत्रपणे लागू आहे.
RTGS ट्रान्झेक्शन शुल्क
बँक शाखेला भेट देऊन आरटीजीएस व्यवहार करण्यासाठी 2-5 लाखासाठी 20 रुपये शुल्क आणि 5 लाखाहून अधिक व्यवहारासाठी 40 रुपये शुल्क आकारले जाते. दोन्ही परिस्थितीमध्ये स्वतंत्रपणे जीएसटी आकारला जातो. चालू खातेदारांसाठी एनईएफटी / आरटीजीएससाठी कोणतेही शुल्क नाही. (SBI charges internet banking fees for these two online services)
Viral Video : रस्ता ओलांडण्यासाठी तरुण आला, पण अचानक ‘असं’ घडलं की व्हिडीओ व्हायरलhttps://t.co/4ZJjlGwDxE#viral | #ViralVideo | #Accident | #RoadAccident
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 5, 2021
इतर बातम्या