SBI बँकेची अनोखी सुविधा, पैसे भरण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, बँक कर्मचारी घरी येणार

आम्ही तुम्हाला बँकेच्या अशा सुविधेची माहिती देणार आहोत, ज्या सुविधेच्या माध्यमातून ग्राहकांना आपल्या कामांसाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही तर बँकेचा कर्मचारी स्वत: तुमच्या दाराशी येईल (SBI doorstep banking facility for customers).

SBI बँकेची अनोखी सुविधा, पैसे भरण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, बँक कर्मचारी घरी येणार
आधार कार्ड बँक अकाऊंटला लिंक करा
Follow us
| Updated on: Jan 17, 2021 | 10:41 PM

मुंबई : आपल्याला स्वत:च्याच बँक खात्यामधून पैसे काढायचे असतील किंवा पैसे टाकायचे असतील, तर अनेकदा आपण विचारात पडतो. बँकेत किती वेळ लागेल, या विचाराने आपण चिंतातूर होतो. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेत गेल्यावर लायनीत उभं राहून प्रतिक्षा करणे हे जास्त त्रासदायक असतं. बँकेतील लोकांची गर्दी, टोकण नंबर घेतल्यावर वाट पाहत एकाच ठिकाणी बराच वेळ बसणं, हे ज्येष्ठ नागरिकांसाठी खरंतर आव्हानात्मकच असतं. मात्र, आम्ही तुम्हाला बँकेच्या अशा सुविधेची माहिती देणार आहोत, ज्या सुविधेच्या माध्यमातून ग्राहकांना आपल्या कामांसाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही तर बँकेचा कर्मचारी स्वत: तुमच्या दाराशी येईल (SBI doorstep banking facility for customers).

बँकेच्या या सुविधेचं नाव डोअरस्टेप सुविधा असं आहे. या सुविधेअंतर्गत बँक कर्मचारी ग्राहकाच्या एका फोनकॉलवर ग्राहकाच्या घरी जातात. त्यानंतर ते ग्राहकांना सुविधा पुरवतील. विशेष म्हणजे तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुम्ही चेक, डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डरचं पिकअप, अकाउंट स्टेटमेंट रिक्वेस्ट याबाबतच्या सर्व सुविधा तुम्हाला घरबसल्या अनुभवता येतील (SBI doorstep banking facility for customers).

स्टेट बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत माहिती दिली आहे. डोअरस्टेप बँकिंग या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर ग्राहकांनी 18001037188 आणि 18001213721 या टोल फ्री नंबरवर फोन करावं, असं आवाहन बँकेकडून ट्विटरवर करण्यात आलं आहे.

सुविधाचा लाभ कसा घेता येईल?

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी अॅप, वेबसाईट किंवा कॉल सेंटरद्वारे ग्राहकांना त्यांचं नाव रजिस्टर करावं लागेल. बँकेची सुट्टी वगळता इतर दिवशी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 1800111103 या टोल फ्री क्रमांकावर फोन करुन ग्राहक आपलं नाव नोंद करु शकतात. स्टेट बँकेच्या या खास सुविधेसाठी बँकेच्या https://bank.sbi/dsb या अधिकृत वेबसाईटला भेट देवूनहीन ग्राहकांना अधिकची माहिती मिळू शकते. याशिवाय ते त्यांचं खातं ज्या शाखेत आहे तिथे माहिती मिळवू शकतात.

सुविधेचा फायदा नेमका कुणासाठी?

डोअरस्टेप बँकिंग सुविधा ही 70 वर्षापेक्षा जास्त वयोगटाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. त्याचबरोबर दिव्यांग आणि अंध नागरिकांसाठी ही सुविधा आहे. त्याचबरोबर जॉईंट खात्याच्या ग्राहकांना या सुविधेचा लाभ मिळणार नाही. याशिवाय मायनर आणि करंट खात्याच्या ग्राहकांना ही सुविधा मिळणार नाही.

हेही वाचा : FASTag | आता व्हॉट्सॲपसह ‘या’ पाच पर्यायद्वारे बनवू शकता FASTag, वाचा सोपे पर्याय

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.