घर घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी, आधी सरकारचा निर्णय, आता SBI कडून स्वस्तात गृहकर्ज

एसबीआयने (State Bank of India) घर घेणाऱ्यांसाठी खास सुवर्ण संधी दिली आहे.

घर घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी, आधी सरकारचा निर्णय, आता SBI कडून स्वस्तात गृहकर्ज
एसबीआयचे गृह कर्ज महागले, एप्रिलपासून नवे व्याज दर लागू
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 3:54 PM

मुंबई : बांधकाम व्यावसायिकांना निवासी संकुल उभारणीसाठी आवश्यक असलेल्या प्रीमियम शुल्कात कपात केल्याने, आता घरे स्वस्त होणार आहे. सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय काहीच दिवसांपूर्वी घेतलाय. अशातच एसबीआयने (State bank Of India) देखील घर घेणाऱ्यांसाठी खास सुवर्णसंधी दिली आहे. 30 लाखापर्यंतच्या कर्जावर 6.8 टक्के तर 30 लाखांवरील कर्जावर 6.95 टक्के कर्ज नव्या ऑफरनुसार एसबीआय देणार आहे. परंतु हासाठी तुमचा CIBIL स्कोअर हा फार महत्त्वाचा ठरणार आहे. (SBI Home Loan Interest Offer)

एसबीआयच्या ऑफरनुसार ग्राहकांचा CIBIL स्कोअर हा कर्जासाठीचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. जर तुमचा CIBIL स्कोअर चांगला असेल तर व्याजदरात तुम्हाला अधिकची सूटही मिळू शकेल तसेच प्रोसेसिंग फीमध्ये देखील सूट मिळू शकेल.

SBI च्या कर्जावरील अट काय?

SBI साठी जर तुमचा CIBIL स्कोअर बँकेच्या नियमानुसार असेल तर तुम्हाला 30 बेसिस पाँइंट्सची सूट मिळेल तसंच कर्ज काढताना लागणारी प्रोसेसिंग फी देखील 100 टक्के माफ होईल.

5 कोटी रुपयांपर्यंतच्या लोनवर ऑफर

SBI कडून भारतातल्या 8 शहरांत रुपये 5 कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज देण्यात येत आहे. या 8 शहरांतील ग्राहकाने जर 5 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं तर 30 बेसिस पॉइंट्सची तुम्हाला सूट मिळणार आहे.

महिलांसाठी वेगळी सूट

SBI महिला ग्राहकांसाठी वेगळी सूट देत आहे. जर महिला ग्राहकाने कर्ज घेतलं तर वेगळे 5 बेसिस पाँइट्स सूट मिळेल.

होम लोन बँलन्स ट्रान्सफर

जर तुम्ही कोणत्याही वेगळ्या बँकेतून कर्ज घेतलं असेल तर ते तुम्ही SBI मध्ये ट्रान्सफर करुन 5 बेसिस पाँइट्सची तुम्हाला सूट मिळेल.

क्रेडिट स्कोअर म्हणजे काय?

क्रेडिट स्कोअर म्हणजेच CIBIL स्कोअर… हा स्कोअर तुमच्या क्रेडिट रिपोर्टवर तयार केला जातो. ट्रान्सयूनियन CIBIL लिमिटेड कंपनी CIBIL स्कोअर जारी करते. हिला CIBIL स्कोअर कंपनी असंही म्हणतात.

CIBIL स्कोअर कसा काऊंट होतो

CIBIL स्कोअर काऊंट करताना लोन पेमेंट हिस्ट्री, लोनच्या पैशांचा वापर, किती प्रकारचं कर्ज आहे, आपलं कर्ज रेकॉर्ड कसं आहे?, यासंबंधीच्या गोष्टी बँक लोन देताना विचार करतात.

(SBI Home Loan Interest Offer)

हे ही वाचा

Gold Silver Price today : सोने आणि चांदीच्या दरात किंचित वाढ; जाणून घ्या आजचा दर

विना इंटरनेट साध्या मोबाईल फोनवरुनही Digital Payment होणार, जाणून घ्या कसे?

...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.