घर खरेदी करताना मोफत मिळणार ‘ही’ सुविधा, SBI ची धमाकेदार ऑफर
बँकांच्या तुलनेत एसबीआयचा व्याज दर खूपच कमी असून ग्राहकांना सहज कर्ज मिळते.

- भारतीय स्टेट बँकेने (SBI) 31 मार्च 2021 पर्यंत गृह कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ केलं आहे. देशातील या सर्वात मोठ्या सरकारी बँकेने गृह कर्जावरील सर्वात कमी व्याज दर घेण्याची घोषणा केली आहे.
- इतकंच नाहीतर एसबीआय अनेक श्रेणींमध्ये त्यांच्या ग्राहकांना गृह कर्ज देत आहे. यासाठी नियमित गृह कर्ज योजना, सरकारी कर्मचार्यांसाठी एसबीआय विशेषाधिकार गृह कर्ज, सैन्य दलातील जवानांसाठी एसबीआय शौर्य गृह कर्ज, एसबीआय मॅक्सगेन होम लोन, एसबीआय स्मार्ट होम, टॉप-अप कर्ज, एसबीआय एनआरआय होम लोन, मोठ्या प्रमाणात कर्जाच्या खास सुविधा देण्यात येत आहे.
- एसबीआय फ्लेक्सीपे होम लोकांसाठी कर्ज आणि महिलांसाठी एसबीआय हरघर होम लोन इत्यादी कर्ज जर तुम्हाला घ्यायचं असेल तर यासाठी मोबाईल नंबर 7208933140 देण्यात आला आहे. ज्यावर तुम्ही मिस्ड कॉल देऊन संपूर्ण माहिती मिळवू शकता.
- मालमत्ता दर घसरले – कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गानंतर बाजार हळू हळू उघडत आहेत आणि अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत आहे. अशात मालमत्तेमध्ये अनेक वर्षांपासून मंदी सुरू आहे.
- Opportunity To Buy Cheap Houses SBI