Diwali Stock | फुलझडी नाहीच, हे तर रिटर्न बॉम्ब, पुढील दिवाळीत करणार धमाका
Diwali Stock | या दिवाळीत गुंतवणूक करुन पुढील दिवाळीपर्यंत जोरदार रिटर्न देणाऱ्या स्टॉकची चाचपणी अनेकांनी सुरु केली आहे. त्यासाठी काहींनी गुंतवणूक तज्ज्ञांकडे सल्ला विचारला आहे. तर काही जण विविध बिझनेस चॅनल्सकडे वळले आहेत. एसबीआय सिक्युरिटीजने ग्राहकांसाठी हे स्टॉक निवडले आहेत.
नवी दिल्ली | 8 नोव्हेंबर 2023 : दिवाळीचा सण आता तोंडावर आला आहे. 5 दिवस चालणारा हा सण देशात आनंदोत्सव आणतो. या दिवशी बाजारांपासून घर, कार्यालयापासून मोठं-मोठ्या कारखान्यापर्यंत दिवाळी सणाचे भरते आले आहे. सगळीकडे तयारी सुरु झाली आहे. अनेक जण शॉपिंगमध्ये गुंतले आहेत. शेअर बाजार पण दिवाळी साजरी करण्याच्या तयारीत आहे. यंदा कोणता शेअर जास्त पावला याची खलबतं सुरु आहे. तर पुढील दिवाळीपर्यंत कोणता शेअर मालामाल करणार याची चाचपणी सुरु आहे. एसबीआय सिक्युरिटीजनुसार हे स्टॉक ग्राहकांना मालामाल करतील.
SBI Securities चे टॉप दिवाळी स्टॉक्स
- आयसीआयसीआय बँक – आयसीआयसीआय बँकेचा शेअर आज 936.55 रुपयांच्या जवळपास प्रति शेअर ट्रेड करत होता. हा शेअर आता खरेदी करुन ठेवल्यास पुढील वर्षात तो चांगला परतावा देईल. एका वर्षाकरीता या शेअरचे टार्गेट 1081 रुपये आहे.
- मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड – मारुती सुझुकी इंडियाचा शेअर आज 10,310 रुपये प्रति शेअरवर ट्रेड करत आहे. हा शेअर एका वर्षासाठी राखून ठेवल्यास फायदा होईल. एका वर्षासाठी या शेअरचे टार्गेट 12,000 रुपये ठेवण्यात आले आहे. पुढील दिवाळीपर्यंत हा स्टॉक गुंतवणूकदारांना मालामाल करेल.
- अल्ट्राटेक सिमेंट – अल्ट्राटेक सिमेंटचा शेअर 8,686.20 रुपये प्रति शेअरवर ट्रेड करत आहे. एका वर्षात म्हणजे पुढील दिवाळीपर्यंत हा शेअर 9800 रुपयांचा स्तर गाठण्याची शक्यता एसबीआय सिक्युरिटीजने वर्तवली आहे.
- पॉलिकॅब इंडिया लिमिटेड – पॉलिकॅब इंडिया लिमिटेडची सध्याचा बाजार भाव CMP 5121.10 रुपये आहे. पुढील दिवाळीपर्यंत हा शेअर 5877 रुपयांचे लक्ष गाठेल, असा अंदाज आहे.
- कल्याण ज्वेलर्स इंडिया – कल्याण ज्वेलर्स इंडियाचा शेअर यावेळी 345.75 रुपये प्रति शेअरवर व्यापार करत आहे. एका वर्षात हा शेअर 364 रुपयांचा पल्ला गाठेल अशी शक्यता आहे.
- प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड – हा शेअर सध्या 561 रुपयांवर व्यापार करत आहे. पुढील दिवाळीपर्यंत हा शेअर 633 रुपये प्रति शेअरचा पल्ला गाठण्याची शक्यता आहे. प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड ही भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ती इंजिनिअरिंग कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय पुण्यात आहे.
- टीटागड रेल्वे सिस्टम्स लिमिटेड – हा शेअर सध्या 796 रुपयांवर व्यापार करत आहे. पुढील दिवाळीसाठी या शेअरचे टार्गेट 200 रुपयांपेक्षा अधिक ठेवण्यात आले आहे.
- Mrs. बेक्टर्स फूड स्पेशियलिटीज लिमिटेड – या कंपनीचा शेअर सध्या 1220 रुपयांवर आहे. एका वर्षात हा शेअर 1358 रुपयांचा टप्पा गाठण्याचा अंदाज आहे. 2020 मध्ये हा शेअर 501 रुपये होता. त्यावेळी पण या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले होते.
हे सुद्धा वाचा
- कोल्ते पाटील डेव्हलपर्स लिमिटेड – कोल्ते पाटील डेव्हलपर्स लिमिटेडचा शेअर 485.50 रुपये प्रति शेअर आहे. पुढील वर्षांसाठी या शेअरची टार्गेट प्राईस 570 रुपये आहे. हा शेअर पुढील दिवाळीपर्यंत 1072 रुपये प्रति शेअरवर जाण्याची शक्यता आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.