नव्या वर्षात घर खरेदी करु इच्छिणाऱ्यांसाठी SBIची खास भेट!

SBI मध्ये तुमचं खातं आहे आणि तुमच्याकडे YONO अॅप असेल तर तुम्ही गृहकर्जासाठी अर्ज करु शकता. त्यातून तुम्हाला व्याजदरात जास्तीची सूट मिळणार आहे.

नव्या वर्षात घर खरेदी करु इच्छिणाऱ्यांसाठी SBIची खास भेट!
एसबीआयचे गृह कर्ज महागले, एप्रिलपासून नवे व्याज दर लागू
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 3:54 PM

नवी दिल्ली: कोरोना आणि लॉकडाऊनमुळे 2020 हे वर्ष तर आलं तसं गेलं. छोट्या-मोठ्या शहरात स्वत:चं एक घर असावं अशी स्वप्न पाहणाऱ्यांना 2020 मध्ये मोठा मनस्ताप सहन करावा लागला. पण नव्या वर्षात म्हणजे 2021 मध्ये घर खरेदी करु इच्छिणाऱ्यांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियानं मोठी भेट देऊ केली आहे. प्रोसेसिंग फीमध्ये सूट देण्यासह व्याजदरातही सवलत देण्याचा निर्णय SBI ने घेतला आहे. (SBI’s special gift for those who want to buy a house in the new year)

SBI मध्ये तुमचं खातं आहे आणि तुमच्याकडे YONO अॅप असेल तर तुम्ही गृहकर्जासाठी अर्ज करु शकता. त्यातून तुम्हाला व्याजदरात जास्तीची सूट मिळणार आहे. ही सूट 0.25 टक्के असू शकते. SBIने ट्वीट करुन ही माहिती दिली आहे.

व्याजदरात कशी मिळेल सवलत?

‘हे वर्ष 2021 आहे आणि एक घर खरेदी करणं पहिल्यापेक्षा अधिक स्वस्त आहे. गृहकर्जासाठी अर्ज करा आणि व्याज दरासह प्रोसेसिंग चार्जमधील सवलतींचा आनंद घ्या. 6.90 टक्के सुरुवातीच्या व्याजदरावर गृह कर्जासाठी बँक ऑफर करत आहे. फेस्टिव्ह ऑफरनुसार व्याजदरात 0.20 टक्के सवलत मिळवू शकता. इतकच नाही तर तुमच्याकडे असलेल्या YONO अॅपद्वारे अप्लाय केल्यास 0.05 टक्के अतिरिक्त सूट मिळेल. म्हणजे आपण व्याज दरात एकूण 0.25 टक्क्यांपर्यंत सूट मिळवू शकणार आहात’, असं ट्वीट SBI बँकेनं केलं आहे.

30 लाखांपर्यतच्या गृहकर्जासाठी SBI 6.90 टक्के व्याज आकारत आहे. तर 30 लाखांपेक्षा जास्तीचं गृह कर्ज असेल तर तुम्हाला 7 टक्के व्याज दर असणार आहे. ७५ लाख रुपयांपर्यंतचं घर खरेदी केल्यावर ग्राहकांना व्याजदरात 0.25 टक्क्यांची सवलत मिळणार आहे. व्याजदरातील ही सवलत ग्राहकांच्या सिबिल स्कोरवर अवलंबून असेल. त्याचबरोबर YONO अॅपद्वारे गृहकर्जासाठी अप्लाय केल्यास त्यावरही व्याजदरात सूट मिळणार आहे.

संबंधित बातम्या:

SBI खातेदारांना मोठा दिलासा; आता ‘या’ सर्व सुविधा घरबसल्या मिळणार; पण फायदा कोणाला?

ITR date extended latest News | रिटर्न भरतानाची छोटीशी चूक; कर परताव्यात ठरणार मोठी अडचण

SBI’s special gift for those who want to buy a house in the new year

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.