Semiconductor : ‘मेड इन भारत’ चिप! लवकरच मोहर

Semiconductor : Micron ही अमेरिकन कंपनी लवकरच भारताचे चिप हब होण्याचे स्वप्न साकार करेल. चिप उत्पादनासाठी या कंपनीने भारतात 825 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे. टाटा समूह येथील व्यवस्थापन करेल. त्यामुळे येत्या काही महिन्यात चिपवर सुद्धा मेड इन भारत अशी मोहोर लागेल.

Semiconductor : 'मेड इन भारत' चिप! लवकरच मोहर
Follow us
| Updated on: Sep 24, 2023 | 3:50 PM

नवी दिल्ली | 24 सप्टेंबर 2023 : नव्या दमदार आयफोन 15 ने जगभरात गर्दी खेचली आहे. या नवीन स्मार्टफोनची जगभर चर्चा आहे. या चर्चेमागे भारत पण आहे. कारण हा स्मार्टफोन भारतात तयार झाला आहे. त्यात ISRO चे नॅव्हिगेशन बसविण्यात आलेले आहे. ही भारतासाठी मोठी जमेची बाजू आहे. आता तंत्रज्ञानात आघाडीचे हे मिशन इथंच थांबलेलं नाही. तर चीन, तैवान आणि दक्षिण कोरीयाला मात देण्यासाठी सेमीकंडक्टर हब होण्याची तयारी पण देशाने सुरु केली आहे. लवकरच सेमीकंडक्टर आणि Chip वर पण मेड इन भारताची मोहोर असेल. भारताचा जगभरात बोलाबाला होईल. Micron ही अमेरिकन कंपनी लवकरच भारताचे चिप हब होण्याचे स्वप्न साकार करेल.

चिप तयार करणारी पहिली कंपनी

भारताला सेमीकंडक्टर हब तयार करण्यासाठी मायक्रॉन टेक्नॉलॉजीने एक पाऊल पुढे टाकले आहे. काल गुजरातमधील सानंद एमआयडीसीमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्पाचा श्रीगणेशा झाला. सूचना आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, राज्य मंत्री राजीव चंद्रशेखर, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेन्द्र पटेल यांच्या उपस्थितीत प्रकल्प सुरु करण्याचा नारळ फोडल्या गेला. या ठिकाणी सेमीकंडक्टर टेस्टिंग आणि अस्मेबलिंग करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

5000 जणांना नोकऱ्या

सानंद औद्योगिक वसाहतीत टाटा-मायक्रॉन प्रकल्प आकार घेत आहे. लवकरच कुशल मनुष्यबळाची भरती करण्यात येईल, अशी घोषणा मायक्रॉनने केली आहे. या प्रकल्पातून थेट 5000 जणांना नोकऱ्या मिळतील. तर 15000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल. तर व्हेन्डर्स आणि कुशल कामगारांच्या हाताला रोजगार मिळेल. एक इको सिस्टम तयार होईल.

भारतात 2 लाख चिप्सची मागणी

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारताच्या क्षमता वाढल्याचे सांगितले. सध्या देशात 2 लाख चिप्सची मागणी आहे. येत्या काही वर्षात ही मागणी 5 लाख कोटीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासह इतर प्रकल्प झटपट पूर्ण झाल्यास लवकरच भारत देशातंर्गत मागणी पूर्ण करुन निर्याच करेल. डिसेंबर 2021 मध्ये भारताने सेमीकंडक्टर मिशनची सुरुवात केली आहे. आता लवकरच उत्पादन सुरु होणार आहे. फॉक्सकॉनसह इतर खेळाडू पण मैदानात उतरले आहेत.

आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.