सेन्सेक्सची ऐतिहासिक झेप, निर्देशांक पहिल्यांदा 50 हजारांवर, गुंतवणूकदारांनी 1 लाख 40 कोटी रुपये कमावले

मुंबई शेअर बाजाराचा (BSE) निर्देशांक असलेल्या सेन्सेक्सने (Sensex) 50 हजारांचा विक्रमी टप्पा ओलांडला. (Sensex holds 50k

सेन्सेक्सची ऐतिहासिक झेप, निर्देशांक पहिल्यांदा 50 हजारांवर, गुंतवणूकदारांनी 1 लाख 40 कोटी रुपये कमावले
भांडवली बाजार
Follow us
| Updated on: Jan 21, 2021 | 11:06 AM

मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक कल आणि जो बायडन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतल्यामुळे झालेल्या सकारात्मक परिणामामुळे भारतीय शेअर बाजार (Share market) ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचला आहे. मुंबई शेअर बाजाराचा (BSE) निर्देशांक असलेल्या सेन्सेक्सने (Sensex) 50 हजारांचा विक्रमी टप्पा ओलांडला. सेन्सेक्सने 200 पॉइंटसची झेप घेत 50,126.76 चा टप्पा गाठला भांडवली बाजाराच्या आजवरच्या इतिहासात सेन्सेक्सने पहिल्यांदाच ही पातळी गाठली आहे. (Sensex holds 50k up 126 points for first time)

जो बायडन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्याचा परिणाम आणि जागतिक बाजारातून घरगुती बाजाराला मिळत असलेले सकारात्मक कल याच्या जोरावर सेन्सेक्सनं ऐतिहासिक 50 हजारांचा टप्पा पार केला. आज भांडवली बाजार उघडल्यानंतर सेन्सक्स आज पहिल्यांदा 50 हजारांच्या स्तरावर उघडला. बीएसईच्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्येही वाढ दिसून आली. मिडकॅफ इंडेक्समध्ये 0.62 तर स्मॉलकॅफ इंडेक्समध्ये 0.60 टक्के वाढ झाली. तर निफ्टी निर्देशांक 14 हजार 700 अंकापर्यंत पोहोचला.

अमेरिकेतील बाजाराचे नवे विक्रम

अमेरिकेतील शेअर बाजारामध्येही जो बायडन यांच्या शपथविधीचा परिणाम दिसून आला. डाओ जोंस आणि S&P नवा विक्रम करत बंद झाला. बुधवारी डाओ जोंसमध्ये निर्देशांक 258 अंकाची वाढ होत 31188 पर्यंत पोहोचला. तर नॅसडॅक 260 अकांच्या तेजीसह 13457 वर बंद झाला. एसएंडपी500 मध्ये 53 अंकांची वाढ होत 3852 वर निर्देशांक बंद झाला.

गुंतवणूकदारांना लॉटरी

भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. शेअर बाजार उघडल्यानंतर बाजारात गुंतवणूकदारांना जवळपास 4.40 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांची मार्केट कॅप 1,97,70,572.57 कोटी रुपये होता. गुरुवार बाजार सुरु झाल्यानंतर 1,35,552 कोटी रुपयांची वाढ झाली आणि मार्केट कॅप 1,99,06,124,57 कोटी रुपये झाला.

दरम्यान, मुंबई शेअर बाजाराचा (BSE) निर्देशांक असलेल्या सेन्सेक्सने (Sensex) 11 जानेवारीला 49 हजाराचा विक्रमी टप्पा ओलांडला होतो.

संबंधित बातम्या:

सोनं स्वतात खरेदी करा! RBI कडून डिजिटल पेमेंटवर खास ऑफर

SBI अलर्ट | Instant Loan App पासून सावधान, पैशांची गरज असल्यास ‘हे’ करा

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्कने प्रतितास 127 कोटी रुपये कमावले, जाणून घ्या कसे?

(Sensex holds 50k up 126 points for first time)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.