सावधान ! 11 बँकांतून पावणेसात लाखांच्या नकली नोटा जप्त

सावधान ! 11 बँकांतून पावणेसात लाखांच्या नकली नोटा जप्त, नोट नकली कुठली आणि खरी कुठली हे आधी जाणून घ्या (seven lakh rupees fake note seized from 11 banks)

सावधान ! 11 बँकांतून पावणेसात लाखांच्या नकली नोटा जप्त
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 1:26 PM

नवी दिल्ली : तुम्ही जर बँकेत पैसे काढायला जात असाल तर पैसे हातात घेतल्यावरच ते आधी नीट तपासून पाहा. तुमच्या हातात नकली नोटा येऊ शकतात. केंद्र सरकारची काळा पैशांविरोधातील कारवाई तसेच नोटबंदीच्या निर्णयामुळे नकली नोटांचा धोका आणखीनच वाढला आहे. अहमदाबादेतील 11 बँकांवरील कारवाईतून हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. या बँकांमधून तब्बल 6 लाख 75 हजारांहून अधिक नकली नोटा जप्त करण्यात आल्या. यात 500, 200 आणि 2000 रुपयांच्या नकली नोटा होत्या. या कारवाईवरून आपल्याला आता अधिकची खबरदारी घ्यावी लागेल हा धडा घेता येईल. (seven lakh rupees fake note seized from 11 banks)

खरी आणि नकली नोट कशी ओळखायची?

नकली नोटांची ओळख पटवण्यासाठी आपल्याला रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक तत्वे म्हणजेच गाईडलाईन्स माहिती असायला हव्यात. – 2000 च्या नोटीचा बेस कलर मजेंटा आहे, तर साईज 66 मिमी बाय 166 मिमी आहे. नोटच्या पुढील बाजूला महात्मा गांधीचे, तर मागील बाजूला मंगळयानाचे छायाचित्र आहे. – नोट लाईटसमोर 45 अंशांच्या कोनातून पाहिली की 2000 लिहिल्याचे दिसेल. – देवनागरीमध्येही 2000 लिहिलेले असेल. – मध्यभागी महात्मा गांधीजींचे छायाचित्र असेल. – सूक्ष्म अक्षरांमध्ये भारत व इंडिया लिहिलेले आहे. – नोटीला सिक्युरिटी थ्रेड असून हलकीशी घडी घातल्यास हिरवा रंग निळा दिसू लागतो. – गॅरेन्टी क्लॉज, गव्हर्नर स्वाक्षरी आणि प्रॉमिस क्लॉज नोटच्या उजव्या बाजूला आहे. – महात्मा गांधीजींचे छायाचित्र आणि इलेक्ट्रोटाईप 2000 वॉटरमार्क आहे. – वरती डाव्या बाजूचे आकडे आणि खाली डाव्या बाजूचे आकडे डावीकडून उजवीकडे मोठे होतात. या ठिकाणी लिहिलेल्या 2000 नंबरचा हिरवा रंग निळा होतो. – उजव्या बाजूला अशोक स्तंभ आहे. – दृष्टीहिनांसाठी गांधीजींचे छायाचित्र, अशोक स्तंभाचे प्रतिक, ब्लीड लाईन आणि ओळख चिन्हाची विशोष रचना आहे. – उजव्या बाजूला आयाताकार बॉक्समध्ये 2000 लिहिलेले आहे. – उजव्या आणि डाव्या बाजूला सात ब्लीड लाईन्स आहेत.

मागील बाजूला काय आहे?

– नोट कधी छापलीय, याचे वर्ष आहे. – स्लोगनबरोबर स्वच्छ भारतचा लोगो आहे. – मध्यभागी लँग्वेज पॅनेल – मंगळयानचे छायाचित्र – देवनागरीमध्ये 2000 लिहिलेले आहे. (seven lakh rupees fake note seized from 11 banks)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.