Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market : एचडीएफसीसह या कंपन्यांना जबर फटका, गुंतवणूकदारांना रिलायन्सची लॉटरी

Share Market : एचडीएफसीसह या कंपन्यांना जबर फटका बसला. शेअर बाजारात गेल्या आठवड्यात मोठी अपडेट समोर आली आहे. तर यामध्ये रिलायन्सने गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून दिला.

Share Market : एचडीएफसीसह या कंपन्यांना जबर फटका, गुंतवणूकदारांना रिलायन्सची लॉटरी
Follow us
| Updated on: Aug 13, 2023 | 5:31 PM

नवी दिल्ली | 13 ऑगस्ट 2023 : शेअर बाजारात (Share Market) गेल्या आठवड्यात मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात घसरणीचे सत्र दिसून आले. बीएसई सेन्सेक्समध्ये जवळपास 400 अंकांची घसरण दिसून आली. शेअर बाजाराने या वर्षांत अनेकदा नवनवीन रेकॉर्ड केले आहे. शेअर बाजारा आता नवीन इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. पण या पडझडीमुळे या गतीला, या तेजीला अडथळा आला आहे. त्याचा फटका देशातील मोठ्या उद्योग समूहाला बसला आहे. तसेच अनेक मोठ्या कंपन्यांचे नुकसान झाले आहे. याचा सर्वाधिक फटका एचडीएफसीला बसला आहे. या पडझडीतही नवीन रेकॉर्ड करणारी रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industry) आता सर्वात मौल्यवान कंपनी ठरली आहे.

इतका बसला फटका

देशातील टॉप-10 कंपन्यांचे बाजारातील भांडवल गेल्या आठवड्यात 74,603.06 कोटी रुपये घटले. या कंपन्याच्या शेअरचे मूल्य घटले आहे. म्हणजे या कंपन्यांच्या शेअर होल्डर्सची व्हॅल्यू पण कमी झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना पण त्याचा फटका बसला. त्यांचे गुंतवणूकीचे मूल्य घटले आहे.  तर  रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस आणि भारतीय स्टेट बँकेला फायदा झाला आहे.

हे सुद्धा वाचा

एचडीएफसी बँकेचे सर्वात जास्त नुकसान

देशातील टॉप-10 कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँकेचा समावेश होतो. या आठवड्यात बँकेला त्यांच्या बाजार मुल्यात सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले. एचडीएफसी बँकेचे भांडवल 25,011 कोटी रुपयांनी घटले. आता मार्केट कॅपिटलायझेशन 12,22,392.26 इतके उरले आहे. याशिवाय आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस आणि आयटीसीचे मार्केट व्हॅल्यू घसरले आहे.

या कंपन्यांचे शेअर घसरले

  • गेल्या आठवड्यात देशातील दुसरी सर्वात मोठी खासगी बँक आयसीआयसीआय बँकेच्या शेअरच्या किंमतीत घसरण आली. त्याचा थेट परिणाम बाजारातील भांडवलावर दिसून आला. आयसीआयसीआय बँकेचे बाजारातील मूल्यांकन 12,781 कोटी रुपयांनी घसरुन 6,66,512.90 कोटी रुपयांवर आले.
  • भारती एअरटेलचे मार्केटकॅप 11,096.48 कोटी रुपये घसरुन 4,86,812.08 कोटी रुपये राहिले. हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीला फटका बसला. तिचे बाजारातील भांडवल 10,396.94 कोटी रुपयांनी घसरले. ते आता 5,87,902.98 कोटी रुपये झाले. तर आयटीसीला 7,726.3 कोटींचा फटका बसला. मार्केट कॅप आता 5,59,159.71 कोटी झाले. बजाज फायनान्स आणि इन्फोसिसला ही घसरणीचा सामना करावा लागला.

रिलायन्सचा एकहाती झेंडा

बाजारात घसरणीचे सत्र असताना रिलायन्स इंडस्ट्रीजने बाजारात एकहाती किल्ला लढवला. बाजारात चढता आलेख कायम ठेवला. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भांडवलात 25,607.85 कोटी रुपयांची वृद्धी दिसून आली. आता हे भांडवल 17,23,878.59 कोटी रुपये झाले. तर टीसीएस आणि एसबीआय या कंपन्याचे मार्केट कॅप पण वधारले.

सर्वात मौल्यवान कंपनी

या पडझडीतही नवीन रेकॉर्ड करणारी रिलायन्स इंडस्ट्रीत आता सर्वात मौल्यवान कंपनी ठरली आहे. यानंतर टॉप-10 मध्ये क्रमश: टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, इन्फोसिस, आयटीसी, एसबीआई, भारती एअरटेल आणि बजाज फायनान्स यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.