Share Market Diwali | शेअर बाजाराचे विशेष सत्र, दिवाळीत गुंतवणूकदारांना कमाईची संधी
Share Market Diwali | दिवाळीला पण तुम्हाला शेअर बाजारातून कमाई करता येईल. पैशांचा पाऊस पडेल. धन धना धन मुहूर्त गाठता येईल. 12 नोव्हेबर रोजी दिवाळीचा मुहूर्त ट्रेडिंग होईल. या दिवशी दिवसभर ट्रेडिंग होणार नाही. पण केवळ या एक तासात तुम्हाला कमाईची संधी साधता येईल. या दिवशी स्टॉक एक्सचेंज एक तासासाठी सुरु असतात.
नवी दिल्ली | 27 ऑक्टोबर 2023 : दरवर्षीप्रमाणे या दिवाळीत सुद्धा गुंतवणूकदारांना लक्ष्मी दर्शन होऊ शकते. त्यांना सुद्धा दिवाळीत कमाई करता येऊ शकते. दिवाळीत मुहूर्त ट्रेनिंग होईल. दिवाळीत एक तासाच्या ट्रेडिंगची परंपरा अनेक दिवसांपासून सुरु आहे. या दिवशी शेअर बाजारात ट्रेडिंग करणे हे शुभ मानण्यात येते. त्यामुळे दिग्गज गुंतवणूकदार सुद्धा हा मुहूर्त चुकवत नाही. दिवाळीचा मुहूर्त ट्रेडिंग 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 ते 7.15 या वेळेदरम्यान होईल. मुहूर्त ट्रेडिंग दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एक्सचेंजद्वारे आयोजीत करण्यात येणारे विशेष व्यापारी सत्र आहे. ते दरवर्षी आयोजीत करण्यात येते.
एक तासाचे कमाईचे सत्र
या दिवशी शेअर बाजारात एक तासांत कमाईची संधी साधता येते. यावेळी व्यापारी नवीन वर्षाची सुरुवात म्हणून टोकन ट्रेड करतात. गुंतवणूकदार मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान स्टॉक खरेदी करतात. या काळात त्यांनी शेअर खरेदी केले तर त्यांना पूर्ण वर्षभरात कमाई करता येते आणि नफा होतो, अशी त्यांची मान्यता आहे. दिवाळीला शेअर बाजारातील व्यापारी नवीन सेटलमेंट अकाऊंटची सुरुवात करतात. या दिवशी दिवसभर व्यापार सत्र होत नाही.
असे होते ट्रेडिंग
या विशेष व्यापारी सत्रात खास ट्रेड्सचे सेटलमेंट त्याच दिवशी करण्यात येते. सर्वच ट्रेड सेटल करण्यासाठी 15 मिनिटांचे प्री-ओपनिंग आणि क्लोजिंग सेशन पूर्ण करण्यात येते. 2022 मध्ये शेअर बाजार (NSE आणि BSE) 24 ऑक्टोबर 2022 रोजी दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगसाठी 6.15 वाजता सुरु झाला आणि 7.15 वाजता बंद झाला.
या दिवशी कामकाज नाही
- 24 ऑक्टोबर, दसरा
- 14 नोव्हेंबर, दिवाळी, बळी प्रतिपदा
- 27 नोव्हेंबर, गुरु नानक जयंती
- 25 डिसेंबर, नाताळ, ख्रिसमस
मुहूर्त ट्रेडिंगचे महत्व
मुहूर्त ट्रेडिंगचे खास महत्व आहे. या दिवशी गुंतवणूकदार त्याच्या गुंतवणुकीचा प्रवास सुरु करतो. या दिवशी केलेली गुंतवणूक शुभ मानण्यात येते. गुंतवणूकदार या दिवशी पोर्टफोलिओत नवीन स्टॉक जोडतात. तर काही गुंतवणूकदार सध्याच्या शेअरमधील वाटा वाढवतात. गेल्या दोन मुहूर्त सत्रात शेअर बाजारात तेजीचे सत्र दिसून आले. 2022 मधील मुहूर्त ट्रेडिंग वेळी बीएसई आणि एनएसईमध्ये प्रत्येकी 0.88 टक्क्यांची वाढ दिसून आली होती. तर 2021 मध्ये दोन्ही निर्देशांकात 0.49 टक्क्यांची वाढ दिसून आली.