गावातील मुलीचा तुफान जुगाड…शेअर बाजारात रचला कमाईचा डोंगर, अशी केली 2 कोटींची कमाई

Share Market Female Trader : एका खेड्यातून आलेल्या या मुलीने शेअर बाजारातील तज्ज्ञांना अचंबित केले आहे. तिने शेअर बाजारात कमाईचा डोंगर रचला आहे. तिने बाजारातील गुंतवणुकीतून 2 कोटींची कमाई केली आहे. बाजाराचा व्यवस्थित अभ्यास, स्टॉकची माहिती या बळावर तिने जोखीम घेत कमाई केली आहे.

गावातील मुलीचा तुफान जुगाड...शेअर बाजारात रचला कमाईचा डोंगर, अशी केली 2 कोटींची कमाई
शेअर बाजार
Follow us
| Updated on: Nov 09, 2024 | 10:14 AM

शेअर बाजारात केवळ मुलंच नाही तर मुली सुद्धा जोरदार कमाई करत आहेत. अनेक महिला गुंतवणूकदार शेअर बाजारातून खोऱ्याने पैसा कमावत आहेत. या महिला मल्टिबॅगर रिटर्न मिळवत आहेत. सेबीने (SEBI) एक अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार, 2023-24 मध्ये फ्यूचर अँड ऑप्सन ट्रेडिंगमध्ये (F&O) 91.9% पुरूषांना फटका बसला तर 86.3% महिलांन तोटा सहन करावा लागला. म्हणजे 8.1% पुरुष आणि जवळपास 14% महिलांनी ट्रेडिंगमध्ये पैसा कमवण्यात यश मिळवले. बाजारात या मुलीने तिची समयसूचकता, अभ्यास आणि शेअर कंपन्यांची इत्यंभूत माहिती मिळवत 11 वर्षात 2 कोटी रुपयांचा पोर्टफोलिओ तयार केला. या महिला गुंतवणूकदाराची गुंतवणूक रणनीती कमाल आहे. कोण आहे ही महिला गुंतवणूकदार?

कविताने रचला इतिहास

पश्चिम बंगालमधील बर्दवान येथील कविता नावाच्या गुंतणूकदाराने हा पराक्रम केला आहे. घरातील बेताची परिस्थिती असताना तिने शिक्षणात चमकदार कामगिरी केली. तिने ऑस्ट्रेलियातील एका कंपनीत आयटी प्रोफेशनल म्हणून कामाला सुरुवात केली. मीडियातील वृत्तानुसार, नोकरीशिवाय शेअर बाजारात तिने नशीब आजमावणे सुरू केले. फ्यूचर आण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तिने कोट्यवधींचा पोर्टफोलिओ तयार केला.

हे सुद्धा वाचा

आईला पैसे देऊन घ्यायची व्याज

कविता अभ्यासात हुशार होती. परिस्थिती बेताची असल्याने 14 व्या वर्षापासून तिने लहान मुलांची शिकवणी सुरु केली. त्यातून ती स्वतःचे शिक्षण पूर्ण करत होती. तीने मिंटला दिलेल्या मुलाखतीत एक गोष्ट सांगितली. त्यानुसार ज्यावेळी तिचे नातेवाईक तिला पैसे द्यायचे. ती ते पैसे जमा करायची. घरात कोणत्याही वस्तूची गरज पडली. आईला पैशांची गरज पडली तर ती ही रक्कम द्यायची आणि त्यावर अगदी अल्प व्याज आईकडून घ्यायची. तेव्हापासूनच तिला बचतीचे महत्त्व आणि त्याचे फायदे समजले होते. पैसे वाचवण्यासाठी ती शाळेत, महाविद्यालयात एकतर पायी जायची अथवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करायची. त्या बचतीतूनचतिने मोठी रक्कम उभारली.

शेअर बाजारात केव्हा केली सुरुवात

शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने नोकरीसाठी हालचाल केली. तिला आयटी कंपनीत नोकरी मिळाली. तिचे काही सहकारी फावल्या वेळेत शेअर बाजारात ट्रेडिंग करायचे. तिने भीत भीत शेअर बाजारात सुरुवात केली. त्यानंतर तिला शेअर बाजाराची आवड लागली. अतिरिक्त कमाईचे साधन म्हणून हळूहळू तिने पोर्टफोलिओ तयार केला. तिने शेअर बाजारात लागणारे प्रशिक्षण पूर्ण केले. खास कोर्स पूर्ण केला. युट्यूबवरून बरंच काही शिकली.

तीने इंट्राडे ट्रेडिंग सुरू केले. सुरूवातीला 400-500 रुपये नफ्यापासून सुरूवात झाली. त्यानंतर तिने आईकडून पैसे उधार घेतले. त्यातून पोर्टफोलिओ तयार होत गेला. काही दिवसानंतर पोर्टफोलिओ 20 लाख आणि पुढे 2 कोटींच्या घरात पोहचला. ती आता आठवड्यातील काही दिवस अथवा महिन्यातील काही दिवसच ट्रेडिंग करते.

Non Stop LIVE Update
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?.